वाहतूकदारांना दिलासा : स्कूल बसेसना १०० टक्के कर माफ करण्याचा निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोनामुळे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना करमाफी देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.त्यानुसार केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसेसना १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी वार्षिक करातून १०० टक्के कर माफ करण्यात येईल.

शाळांच्या मालकीच्या तसेच केवळ स्कूल बस म्हणून वापरात येणाऱ्या बसेस,शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसेसना १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी वार्षिक करातून १०० टक्के कर माफ करण्यात येईल.मात्र ज्या स्कूल बस प्रकारातल्या वाहनांनी वरील कालावधीसाठीचा कर भरला असेल तर अशा कराचे महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियमानुसार आगामी काळात समायोजन करण्यात येईल.

Previous articleमंत्रिमंडळाच्या बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय
Next articleपंतप्रधानांच्या पंजाब प्रवासातील घटना ही घातपाताचाच प्रयत्न !