धक्कादायक : मुंबई विद्यापीठाच्या १७८ महाविद्यालयांना प्राचार्यच नाही

मुंबई नगरी टीम

मुंबई । मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत १७८ महाविद्यालये प्राचार्य विना असल्याचे धक्कादायक वास्तव माहिती अधिकारात समोर आले आहे. ८१ महाविद्यालयात प्राचार्याऐवजी संचालक हे पद अस्तित्वात असून,७२७ पैकी १७८ महाविद्यालयेप्राचार्य विना आहेत तर २३ महाविद्यालयाची माहिती विद्यापीठाच्या अभिलेखावर उपलब्ध नाही नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहितीच्या अधिकारा खाली मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयातील प्राचार्याची माहिती मागितली होती.मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयीन शिक्षक मान्यता कक्षाने ३८ पानाची यादी दिली आहे.या यादीत एकूण ८०८ महाविद्यालयाची नोंद असून यापैकी ८१ महाविद्यालयात प्राचार्याऐवजी संचालक हे पद अस्तित्वात आहे. ७२७ पैकी १७८ महाविद्यालय प्राचार्य विना आहेत तर २३ महाविद्यालयाची माहिती विद्यापीठाच्या अभिलेखावर उपलब्ध नाही.ज्या महाविद्यालयात प्राचार्य सारखे महत्वाचे पद रिक्त आहे किंवा प्रभारीच्या हवाली कारभार आहे त्यामध्ये के.जे सोमय्या, ठाकूर एज्युकेशनल ट्रस्ट, शहीद कलानी मेमोरियल ट्रस्ट,तलरेजा महाविद्यालय,वर्तक महाविद्यालय,बॉम्बे फ्लॅइंग क्लब महाविद्यालय,रामजी असार महाविद्यालय,शेठ एनकेटीटी महाविद्यालय, जितेंद्र चौहान महाविद्यालय, मंजरा महाविद्यालय,रिझवी महाविद्यालय,अकबर पिरभोय महाविद्यालय,संघवी महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय,विलेपार्ले केलवानी महाविद्यालय,बॉम्बे बंट्स महाविद्यालय,आरआर एज्युकेशन महाविद्यालय,एचआर महाविद्यालय,अंजुमन इस्लाम महाविद्यालय सारख्या महाविद्यालयाचा समावेश आहे.

Previous articleमराठी पाट्या असाव्यात पण हिंदी इंग्रजी भाषेतील पाट्यांना विरोध नको
Next articleशरद पवारांच्या उपस्थितीत पुणे मेट्रोची चाचणी म्हणजे आयत्या पिठावर रेघोट्या