गडचिरोली जिल्ह्यातील ९ नगरपंचायतीत महाविकास आघाडीचा बोलबाला

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील ९७ नगरपंचायत निवडणूकांचे निकाल काल जाहीर करण्यात आले होते.मात्र गडचिरोली जिल्ह्यातील ९ नगरपंचायतीच्या निवडणूकांची मतमोजणी सुरक्षेच्या कारणास्तव काल ऐवजी आज करण्यात आली.या निकालामध्ये काँग्रेसला सर्वाधिक ३९ जागा मिळाल्या आहेत.भाजपला ३६ जागांवर तर शिवसेनेला १४ जागांवर विजय प्राप्त करण्यात यश मिळाले आहे.गडचिरोली जिल्ह्यातील एकूण १५३ जागांपैकी ७९ जागांवर विजय मिळवत महाविकास आघाडी या ठिकाणी अव्वल ठरली आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील ९ नगरपंचायतीची मतमोजणी आज करण्यात आली.एकूण १५३ जागांपैकी भाजपला ३६,काँग्रेसला ३९ तर राष्ट्रवादी काँग्रेसला २६ जागांवर विजय मिळवता आला आहे. शिवसेनेला एकूण १४ जागा मिळाल्या आहेत.राज्यातील एकूण १०६ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा आज अंतिम निकाल हाती आला असून,त्यानुसार एकूण १८०२ जागांपैकी भाजपला ४१९, राष्ट्रवादी काँग्रेसला ३८१ तर काँग्रेसला ३४४ जागांवर विजय मिळाला आहे. शिवसेनेला या निवडणुकीत एकूण २९६ जागा मिळाल्या आहेत.

Previous articleनिवडणूक निकाल : विदर्भात भाजप अव्वल मात्र सरशी महाविकास आघाडीची
Next articleआजच्या मंत्रिमंडळ बैठकीत ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय