राज्य महिला आयोगावर सदस्यांची नियुक्ती : शिवसेना,राष्ट्रवादीसह काँग्रेसला समान संधी

मुंबई नगरी टीम

मुंबई । महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती करण्यात आली असून,यामध्ये राष्ट्रवादी,शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या प्रत्येकी तीन सदस्यांना संधी देण्यात आली आहे.राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी महिला राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांची यापूर्वीच नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य महिला आयोगाच्या सदस्यपदी सहा जणींची नियुक्ती करण्यात आली आहे.त्यामध्ये समाजसेविका आणि काँग्रेसच्या नेत्या ॲड. गौरी नारायणदास छाब्रीया,बीड जिल्हा शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख ॲड.संगीता चव्हाण,शिवसेनेचे आमदार प्रकाश फातर्पेकर यांची कन्या आणि युवा सेना कोअर कमिटी सदस्या सुप्रदा फातर्पेकर,राष्ट्रवादीच्या बागलाणच्या माजी आमदार दीपिका संजय चव्हाण,नागपूरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका आभा विजयकुमार पांडे आणि काँग्रेसचे माजी दिवंगत नेते दादासाहेब रूपवते यांच्या कन्या आणि प्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस उत्कर्षा रुपवते यांचा समावेश आहे.महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात काल अधिसूचना प्रसिध्द झाली असून अधिसूचना प्रसिध्दी दिनांकापासून या सहा सदस्यांची नियुक्ती पुढील तीन वर्षे कालावधी करीता आहे.

Previous articleलाख आव्हाने येवोत,त्यांना परतवून लावण्याची हिमंत बाळगुया
Next articleकारवाईवरून देवेंद्र फडणवीस संतापले ! म्हणाले….सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस