कारवाईवरून देवेंद्र फडणवीस संतापले ! म्हणाले….सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस

मुंबई नगरी टीम

मुंबई । मालाडमध्ये मंत्री असल्म शेख यांच्यावतीने साकारण्यात आलेल्या उद्यानाला टिपू सुलतानचे नाव दिल्याने आज भाजपा,विहिंप,बजरंग दलाकडून आंदोलन करण्यात आले.त्यावरून आता विरोधक आणि सत्ताधारी आमने सामने उभे ठाकले आहेत.तर क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा कार्यक्रम पोलिस संरक्षणात केल्याने हा सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस असल्याची टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मालाडमध्ये क्रिडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव दिल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.याविरोधात आज भाजप, विहिंप,बजरंग दलाने तीव्र आंदोलन केले.यावेळी अनेक भाजप नेत्यांसह कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.पोलिसांच्या या कारवाईवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे.मालाड येथील क्रीडासंकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा कार्यक्रम पोलिस संरक्षणात हा सत्तेसाठी निर्लज्जतेचा कळस असून,हिंदूंवर अनन्वित करणा-या टिपू सुलतानचे नाव न देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणा-या भाजपा,विहिंप,बजरंग दल कार्यकर्त्यांवर लाठीमार-अटक ! तीव्र निषेध असे ट्विट करीत त्यांनी सत्ताधा-याना खडसावले आहे.

Previous articleराज्य महिला आयोगावर सदस्यांची नियुक्ती : शिवसेना,राष्ट्रवादीसह काँग्रेसला समान संधी
Next articleवाचा : कोणत्या नगरपंचायतीत कोणते आरक्षण;नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर