मुंबई नगरी टीम
पुणे । महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणा-या इयत्ता १२ आणि १० वीच्या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाकडून आज जाहीर करण्यात आले असून,कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या परीक्षा या दोन आठवडे उशिराने होणार आहेत.त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत तर दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १२ वी आणि इयत्ता १० वीच्या परीक्षा आरोग्यदायी आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी काही विशिष्ट उपाय योजना जाहीर केल्या आहेत. त्यातील ठळक मुद्दे खालीलप्रमाणे @msbshse @MahaDGIPR pic.twitter.com/B8L4fDMV4z
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) February 3, 2022
राज्यात बारावी आणि दहावीच्या परीक्षा या ऑफलाईन पद्धतीनेच होणार असून,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून आज इयत्ता १२ आणि १० वीच्या परीक्षांचे वेळापत्रक मंडळाकडून आज जाहीर करण्यात आले आहे.त्यानुसार बारावीची लेखी परीक्षा ४ मार्च ते ३० मार्च या कालावधीत तर दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणार आहे.१२ वीची श्रेणी प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन १४ फेब्रूवारी ते ३ मार्च दरम्यान घेण्यात येईल तर १० वीची श्रेणी प्रात्यक्षिक तोंडी परीक्षा आणि अंतर्गत मूल्यमापन २५ फेब्रूवारी १४ मार्च दरम्यान होणार आहे.प्रचलित पद्धतीनुसार १२ वीची परीक्षा २० फेब्रूवारी दरम्यान तर १० वीची परीक्षा १ मार्च दरम्यान सुरू होते.मात्र यंदा राज्यात कोरोनाच्या संकटामुळे यंदाच्या परीक्षा दोन आठवडे उशीराने घेण्यात येत असल्याचे मंडळाकडून सांगण्यात आले.यंदाच्या १२ वीच्या परीक्षेसाठी १४ लाख ७२ हजार ५६२ तर १० वीच्या परीक्षेसाठी १६ लाख २५ हजार ३११ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.कोरोनामुळे विद्यार्थ्यांचा लेखन सराव कमी झाल्याने लेखी परीक्षेच्या ७० ते १०० गुणांच्या पेपरसाठी ३० मिनिटे जादा वेळ देण्यात आली आहे. तर ४० ते ६० गुणांच्या पेपरसाठी १५ मिनिटे जादा वेळ देण्यात आली आहे.