पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचे कौतुक का केले; अजितदादांनी सांगितले कारण

मुंबई नगरी टीम

मुंबई । लोकसभेत केलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक करतानाच दुसरीकडे काँग्रेसवर हल्लाबोल केला होता.पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचे कौतुक का केले यांचा उलगडा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.जेव्हा जेव्हा देश आणि राज्यावर संकट आल्यानंतर राजकीय जोडे बाजूला ठेवून शरद पवार काम करत करतात त्यामुळेच कदाचित पंतप्रधान मोदी यांनी पवार यांचे कौतुक केले आहे असे अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात कोरोना फैलावण्यास महाराष्ट्र काँग्रेसला जबाबदार धरल्यानंतर पंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यामुळे राजकीय वादळ उठले असतानाच दुसरीकडे मोदी यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे कौतुक केल्याने अनेकांच्या भुवया उचावल्या असतानाच पंतप्रधान मोदी यांनी शरद पवार यांचे कौतुक का केले याचा उलगडा केला.जेव्हा जेव्हा देश आणि राज्यावर संकट आल्यानंतर राजकीय जोडे बाजूला ठेवून शरद पवार काम करत असतात.त्यामुळेच कदाचित पंतप्रधानांनी पवार यांनी कौतुक केले आहे असे अजित पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना संगितले.यावेळी पवार यांनी सध्या गाजत असलेल्या हिजाब प्रकरणावरही भाष्य केले.कोणत्याही देशात राज्यात शहरात धार्मिक तेढ निर्माण होणार नाही यासाठी सर्वांनीच प्रयत्न करायचे असतात.आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे लोक आहोत.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात जे अधिकार दिले आहेत,ते अबाधित ठेवण्याची खबरदारी सर्वांनीच घेतली पाहिजे असे सांगतानाच हिजाबवरुन झालेली घटना दुर्दैवी असल्याचे स्पष्ट मत पवार यांनी मांडले.

कधीकधी दुर्दैवाने काही लोक अशा विषयांमधून राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. आज जग पुढे जात आहे. प्रगत देश आणखी प्रगत होत आहेत. आपल्या देशात तरुणांची एवढी मोठी फळी आहे. अशावेळी या तरुणाईचा वापर विकासासाठी कसा करता येईल, याचा विचार केला गेला पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.एखादा व्हिडिओ क्लिप व्हायरल केली जाते. मग त्यावरुन कुणी ट्विट करते, लगेच त्यावर अकाऊंटर ट्विट पडतात आणि मग त्यातून नको त्या विषयाला महत्त्व दिले जाते. सर्वांनीच समजंस भूमिका मांडून संयम ठेवला पाहिजे असे स्पष्ट मत अजित पवार यांनी व्यक्त केले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात कोरोना महामारी नियंत्रणात आणण्याचे उत्कृष्ट काम झाले. त्या कामाचे कौतुक माध्यमे, न्यायालय आणि विविध संस्थांनी देखील केलेले आहे.धारावीसारख्या भागात कोरोना नियंत्रणात आणण्याचे आव्हानात्मक काम केले. वेळप्रसंगी धीर देऊन आणि कडक निर्बंध लावून नियंत्रण लावण्याचे काम केले. पण कधीकधी राजकीय भूमिकेतून कुणी टीका करतात. लोकशाही असल्यामुळे हा ज्याचा त्याचा अधिकार आहे असेही पवार म्हणाले.

यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी संसदेत बोलत असताना सविस्तर उत्तर दिले आहे.सर्वाधिक रेल्वे गुजरातमधून सुटल्या,इतर राज्यातून किती सुटल्या याची सर्व माहिती समोर आहे.केंद्रानेच मजूरांसाठी रेल्वे पुरविल्या,मोफत धान्य दिले.त्याकाळात मजूरांनाच थांबायचे नव्हते.त्यामुळे मजूरांना मदत करण्यासाठी आपण अन्नछत्र चालविले, त्यांना एसटी बसेसची सुविधा दिली. लॉकडाऊनमध्ये मजूर उपाशीपोटी रस्त्याने चालत निघाले होते.त्यात गरोदर महिला होत्या. वृद्ध आणि लहान मुलेही होती. माणुसकीच्या नात्याने महाराष्ट्राने त्यांना मदत केली असेही त्यांनी सांगितले.नवीन वर्षात अधिवेशन सुरु होते, तेव्हा राज्यपालांचे अभिभाषण असते. त्यासाठी मोठ्या सभागृहाची गरज असते. तसेच कोरोनाची तिसरी लाट ओसरली असली तरी काळजी घेणे आवश्यक आहे.त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत घेण्याचा विचार राज्य सरकारचा आहे.विदर्भात अधिवेशन घ्यायलाच पाहिजे,या मताशी राज्य सरकार देखील सहमत आहे.कोरोनामुळे मागच्या दोन वर्षात विदर्भात अधिवेशन घेणे शक्य झाले नसले तरी पुढच्या काळात विदर्भात अधिवेशन होईल असेही पवार यांनी स्पष्ट केले.अनेक महामंडळावरील नियुक्त्या बाकी आहेत.महिलांशी निगडीत असलेल्या महामंडळावर नियुक्ती जाहीर केलेली आहे. मात्र आता इतर महामंडळाच्या नियुक्त्या फार काळ प्रलंबित न ठेवता ते जाहीर करुन टाकाव्यात असे वैयक्तिक मत व्यक्त करताना काँग्रेस आणि मुख्यमंत्र्यांना याबाबत कळवले असल्याचेही त्यांनी सांगितले.

चंद्रकांत पाटील हे केंद्रात सत्तेत असलेल्या पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहेत.त्यांनी राज्यात जबाबदार मंत्री म्हणून काम केलेले आहे. त्यामुळे त्यांनी एखादे वक्तव्य करताना त्याबाबत पुरावे दिले पाहिजेत. मी मंत्रालयात सर्वात लवकर येऊन सर्वात उशिरापर्यंत बसून काम करणारा मंत्री आहे. हे सर्व जनता जाणते, त्यामुळे चंद्रकांतदादांनी बेजबाबदार व बिनबुडाची वक्तव्ये करु नयेत. महाराष्ट्रात हेलिकॉप्टर घेऊन फिरण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. कुठून कुठे जाणार याचीही माहिती द्यावी लागते. चंद्रकांत पाटील यांना ही वस्तूस्थिती माहीत आहे. तरीही ते अशी वक्तव्य करत आहेत. याला मराठीत ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’. असे म्हणतात. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याला किती गांभीर्याने घ्यावे, हे जनतेने ठरवावे असा टोलाही पवार यांनी यावेळी लगावला.

Previous articleमाफी मागा अन्यथा राज्यातील भाजप नेत्यांच्या घरासमोर ‘महाराष्ट्रद्रोही’ आंदोलन
Next articleकिरीट सोमय्या यांच्यावरील हल्ला महागात पडेल : चंद्रकांत पाटील यांचा इशारा