भाजपचे नेते ठाकरे सरकार पाडण्याच्या तारखा कोणाच्या जीवावर देत आहेत ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून महाराष्ट्र,पश्चिम बंगाल आणि झारखंडचे सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा घणाघाती आरोप शिवसेना नेत आणि खासदार संजय राऊत यांनी करून सरकार पाडण्याच्या तारखा भाजपच्या नेत्यांकडून दिल्या जातात या तारखा कोणाच्या जीवावर दिल्या जात आहेत असा सवाल त्यांनी केला.

राज्यातील ठाकरे सरकार आणि महाविकास आघाडी सरकार मधिल नेत्यांवर विरोधी पक्ष असलेल्या भाजपच्या नेत्यांकडून अनेक आरोप केले जात आहे.यावर आज संजय राऊत यांनी उत्तर दिले.आज मी पत्रकार परिषद घेत असल्याने मला सकाळपासून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन येत होते.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही फोन आला होता असेही राऊत यांनी सांगितले.आप आगे बढो..लढाईची सुरूवात करा असेही काही नेते म्हणाले.मराठी माणसांवर ज्या प्रमाणे आक्रमण करीत आहे.त्यावर कुणीतरी रणशिंग फुंकले पाहिजे ते मी करीत आहे असेही यावेळी राऊत म्हणाले.तुम्ही गुन्हा केला नसले तर कोणाच्या बापाला घाबरू नका असे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.महाराष्ट्र गांडूंची अवलाद नाही हे दाखवून द्यायचे आहे असेही आव्हान राऊत यांनी यावेळी दिले.शिवसेना,ठाकरे आणि पवार परिवारावर केंद्रीय तपास यंत्रणा हल्ले करीत आहे हे देशावरचे संकट असून,त्यांना महाराष्ट्राचे सरकार पाडायचे आहे म्हणून तपास यंत्रणांचा दबाव टाकून वापर केला जात आहे असे सांगून,राज्यातील ठाकरे सरकार पाडण्याच्या तारखा भाजपचे नेते वारंवार देत आहे ते काणाच्या जीवावर देत आहेत असा सवालही राऊत यांनी केला.

राऊत यांनी यावेळी माजी खासदार किरीट सोमय्यावर हल्लाबोल केला.अलिबाग मध्ये ठाकरे परिवाराचे १९ बंगले असल्याचे सोमय्या आरोप करीत आहे.तर आपण तिकडे जावू तिथे बंगले दिसले तर मी राजकारण सोडेल अन्यथा त्याला जोड्याने मारेल असेही राऊत म्हणाले.राज्यात मराठीची सक्ती करू नये म्हणून हेच सोमय्या न्यायालयात गेले होते अशी आठवण राऊत यांनी करून दिली.माझ्या मुलीच्या लग्नानंतर ईडीने तपास केला मात्र माजी वनमंत्री यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नात साडे नऊ कोटी डेकोरेशनवर खर्च केले त्यावेळी ईडीने चौकशी का केली नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Previous articleफडणवीसाच्या काळात एका दुधवाल्याकडे महाराष्ट्रातून साडे तीन हजार कोटी गेले
Next articleप्रविण दरेकरांच्या गाडीला चौथ्यांदा अपघात;चौकशी करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी