फडणवीसाच्या काळात एका दुधवाल्याकडे महाराष्ट्रातून साडे तीन हजार कोटी गेले

मुंबई नगरी टीम

मुंबई । एस नरहर नावाच्या हरियणातील एक दूधवाल्याकडे सात हजार कोटींची संपत्ती असून त्याला फडणवीस सरकारच्या काळात मुख्यमंत्री निवासस्थानातही मुक्तद्वार प्रवेश होता त्याच्याकडे असलेल्या संपत्ती मधील साडे तीन हजार कोटी रुपये हे महाराष्ट्रातून गेल होते अशा शब्दात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला.याची माहिती पंतप्रधान व केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र लिहून देणार असल्याचे सांगून,महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी मदत करा नाही तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल अशा धमक्या दिल्याचा गौप्यस्फोट राऊत यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.

भाजप मधिल साडे तीन नेत्यांचा घोटाळा बाहेर काढण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती.या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले होते.यावेळी राऊत यांनी भाजप आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले.महाराष्ट्र, झारखंड आणि बंगाल ही तीन राज्य सरकारने पाडण्यासाठी ईडी,सीबीआयचा वापर कऱण्यात येतो आहे असे सांगून राऊत म्हणाले की, वीस दिवसांपूर्वी माझ्याकडे भाजपाचे काही नेते आले होते.तुम्ही सरकार पाडण्यासाठी मदत करा नाही तर तुम्हाला तुरुंगात जावे लागेल अशा धमक्या दिल्या.त्यांना मी स्पष्ट शब्दात नकार दिला तेव्हा तीन दिवसांनी माझ्या नजीकच्या लोकावंर धाडी पडू लागल्या असे सांगून राऊत म्हणाले की शरद पवार यांच्या घरातील मुलींवर बहिणींवरही अशाच धाडी पडल्या.भावना गवळी, आनंदराव अडसूळ यांच्यासह अनिल परब यांच्या विरोधातही अशाच कारवाया केल्या जात आहेत ही सर्व प्रकरणे खोटी आहेत.मला गोळ्या घाला किंवा तुरुंगात टाका, हा महाराष्ट्र आहे, तुम्ही शिवसेनेशी पंगा घेत आहेत असा इशाराही राऊत यांनी यावेळी दिला.भाजपने कितीही यंत्रणांचा गैरवापर केला तरी राज्यातील ठाकरे सरकार पडणार नाही. १७० आमदारंचे बहुमत आमच्याकडे आहे. पण २०२४ ला तुमचे दिल्लीतील सरकार पडणार आहे नंतर काय होईल, तुम्ही कुठे जाल असाही इशारा त्यांनी भाजपा नेत्यांना दिला.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा उल्लेख दलाल म्हणजे मराठीत भडवा अशा शब्दात सेनास्टाईलने करून राऊत म्हणाले की, पीएमसी बँकेच्या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार राकेश वाधवान याला ब्लॅकमेल करून किरीट सोमय्यांनी ८० ते शंभर कोटी रुपये रोख घेतले शिवाय देवेंद्र लघानी याला पुढे करून सोमय्या यांनी वाधवान बांधकाम कंपनीकडून करोडो रुपयांच्या वसई येथील जमिनी साडे चार कोटी व सात कोटींना घेतल्या.आता वसईत निकॉनचा चारशे कोटींचा प्रकल्प सुरु असून नील सोमय्या त्याचा संचालक आहे.यासाठी यांनी पीएमसी बँके घोटाळ्याचा थेट पैसा घेतला आहे असा आरोप करून त्याची चौकशी ईडीने करावी असे आव्हानही राऊत यांनी दिले.फडणवीस सरकाच्या कार्यकाळात महाआयटी या संस्थेत पंचवीस हजार कोटींचा घोटाळा झाला त्यातील अमोल काळे हा कोण आहे,त्याला कुठे लपवून ठेवले आहे असेही सवाल राऊत यांनी केले.हा महाराष्ट्र आहे.ही शिवसेना आहे.बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला गुढघे टेकण्याची शिवकवण कधीही दिली नाही. तू काही पाप केले नाहीस,मग कुणाच्या बापाला घाबरू नको असे ठाकरेंचे सांगणे असे सांगून राऊत म्हणाले की पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी सोमय्याच्या निकॉन प्रकल्पाच्या पर्यावरण तपासण्या कराव्यात असे आवाहन करीत महाराष्ट्र् आर्थिक गुन्हे शाखेने सोमय्या यांना पीएमसी घोटाळ्यात अटक करावी आणि मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे असेही राऊत म्हणाले.

याबाबत ईडीकडे सर्व कागदपत्रे तीन महिन्या पूर्वी पाठवली आहेत पण आमच्या वीस वर्षांपूर्वीच्या जमीन खरेदीसाठी ८० वर्षाच्या वृद्धांना, तरूणांना आणि लहान मुलांना ईडीवाले उचलून आणतात याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केला.१५ तारखेला दुपारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेणार अशी गर्जना सेना नेते व प्रवक्ते संजय राऊत यांनी केल्या नंतर गेले दोन दिवस राजकीय क्षेत्रात राऊत काय बोलणार याची मोठी उत्सुकता होती. नाशिक, धुळे,पुणे अशा मुंबई बाहेरच्या भागातून शेकडो शिवसैनिक सेना भवनात येऊन दाखल झाले होते.त्यांच्या सोयीसाठी सेनाभवनाच्या परिसरात मोठे टीव्ही स्क्रीन लावण्यात आले होते.यामुळे दादर परिसरतील वाहतुक व्यवस्था साफ कोलमडली होती. साडे तीन नेत्यांना अनिल देशमुखांच्याच तुरुंगकोठडीत पाठवणार अशीही गर्जना राऊतांनी केली होती. शिवाय ही पत्रकार परिषद माझी नाही तर शिवसेनेची आहे,महाराष्ट्राची आहे असेही राऊत म्हणाले होते.मात्र त्यांनी थेट फारसे आऱोप केले नाहीत. पुढील काळात अशा आणखी पत्रकार परिषदा घेऊन भाजपा नेत्यांच्या आरोपांची मालिका करण्याचे सूतोवाच राऊत यांनी केले.

Previous article११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार; अधिवेशन मुंबईतच होणार
Next articleभाजपचे नेते ठाकरे सरकार पाडण्याच्या तारखा कोणाच्या जीवावर देत आहेत ?