नारायण राणे अडचणीत : दिशा सालियनची बदनामी करणा-यांवर कार्यवाही करण्याची मागणी

मुंबई नगरी टीम

मुंबई । अभिनेता सुशांतसिंह राजपूतची पुर्व मॅनेजर दिशा सालियन हिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप सुक्ष्म मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला होता.राणे यांच्या या आरोपानंतर आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर पत्र लिहून दिशा सालियन हिची बदनामी करणा-यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केल्याने केंद्रीयमंत्री राणे अडचणीत येण्याची शक्यता आहे.

सध्या भाजप आणि शिवसेना नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.एकीकडे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असतानाच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेवून अभिनेता सुशांतसिंह राजपूतची पुर्व मॅनेजर दिशा सालियन हिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली होती.राणे यांच्या आरोपानंतर आता शिवसेनेने त्यांना अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते.मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर पत्र लिहून दिशा सालियन हिची बदनामी करणा-यावर तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.दिशा सालियनच्या मृत्यूनंतर सीबीआयने या प्रकरणाची चौकशी केली होती.त्यात तिच्यावर बलात्कार करण्यात आलेला नसून ती गरोदर नसल्याचे शवविच्छेदनाच्या अहवालात नमूद करण्यात आले असल्याचे या पत्रात पेडणेकर यांनी म्हटले आहे.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विट मध्ये काय म्हटले आहे

” याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मालवणी पोलीस स्टेशन यांना ४८ तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून देण्यात आले आहेत.”

वारंवार होणा-या बदनामीमुळे दिशाच्या आई वडीलांनी पोलीसामध्ये तक्रार केली असतानाही सुक्ष्म मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेवून वारंवार तिच्यावर बलात्कार करून हत्या आरोप करीत असल्याचेही महापौरांनी या पत्रात म्हटले आहे.दिशा सालियनच्या मृत्यूनंतर तिच्याबाबत राजकीय नेत्यांकडून प्रसार माध्यमातून चुकीचे आरोप करण्यात येत असून बदनामी करणा-यावर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी महापौर पेडणेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पाठलेल्या पत्रात केली आहे.याबाबत मालवणी पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक यांनी ४८ तासात अहवाल सादर करण्याचे आदेश राज्य महिला आयोगाकडून देण्यात आल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

Previous articleकुसुमाग्रज यांच्या जयंती दिवशी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणार !
Next articleफसवणूक कोण करत आहे याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावे : सोमय्यांचे आव्हान