नवाब मलिक जाहीरपणे बोलतात,त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होईल याची खात्री होती

मुंबई नगरी टीम

मुंबई । जे लोक केंद्र सरकारच्या विरोधात किंवा यंत्रणेच्या विरोधात स्वच्छ भूमिका मांडत असल्याने त्यांना त्रास देण्याचा प्रकार घडत असल्याचे दिसत असून,आज ना उद्या कधीतरी हे घडेल याची खात्री होती. राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात,त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल,याची खात्री होती.त्यामुळे यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे खासदार शरद पवार यांनी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) केलेल्या कारवाई नंतर दिली.

दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याच्या जमीन व्यवहार प्रकरणी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडीने) कारवाई केल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.जे लोक केंद्र सरकारच्या विरोधात किंवा यंत्रणेच्या विरोधात स्वच्छ भूमिका मांडत आहेत, त्यांना त्रास देण्याचा प्रकार घडत असल्याचे दिसत असून,आज ना उद्या कधीतरी हे घडेल याची खात्री होती.नवाब मलिक हे जाहीरपणे बोलतात,त्याप्रमाणे त्यांच्यावर कारवाई होईल,याची खात्री होती.त्यामुळे यावर अधिक भाष्य करण्याची गरज नाही असेही पवार यावेळी म्हणाले.नवाब मलिक यांच्यावर कोणती केस काढली याची माहिती नाही. कुणी मुस्लिम कार्यकर्ता असला तर दाऊदचे नाव घ्यायचे आणि आरोप करायचे, यात काही नवीन नाही.पण खरे काय हे कुणालाही माहिती नाही, असेही पवार म्हणाले.मी राज्याचा मुख्यमंत्री होतो,तेव्हा माझ्यावरही असाच आरोप झाला होता.त्यानिमित्ताने राज्यात एक वातावरण निर्माण झाले होते. आज त्या गोष्टीला २५ वर्ष झाली.पण आजही तशीच नावे घेऊन लोकांना बदनाम करून सत्तेचा गैरवापर करण्याचे काम सुरु असल्याचे यांनी सांगितले.

Previous articleअनिल देशमुखांनंतर राष्ट्रवादीला दुसरा धक्का; मंत्री नवाब मलिकांना अटक
Next articleनवाब मलिकांना ३ मार्च पर्यंत ईडी कोठडी ; मंत्रीपदाचा राजीनामा घेणार नाही