गुढीपाडव्याच्या आदल्याच दिवशी चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्य सरकारने आज वरिष्ठ चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. केले.वित्त विभागाचे (सुधारणा ) प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांची प्रधान सचिव आणि विकास आयुक्त म्हणून नियोजन विभागात बदली करण्यात आली आहे.

विक्रीकर विभागाच्या विशेष आयुक्त शैला यांची वित्त विभागात (सुधारणा ) सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. माहिती व तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव विवेक भिमनवार यांची मुंबई चित्रनगरीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.तर ग्रामविकास विभागाचे विभागाचे सहसचिव एम.व्हि.मोहिते यांची नियुक्ती अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे.

Previous articleपंतप्रधान महागाई पे चर्चा कधी करणार ? ज्वलंत विषय सोडून ‘प्रचारमंत्री’ इव्हेंटबाजीत मग्न
Next articleमहाविकास आघाडी सरकारला गरिबांची नाही, तर बेवड्यांची चिंता अधिक