काँग्रेसच्या आमदारांनी सोनिया गांधींकडे काँग्रेसच्या कोणत्या मंत्र्याची तक्रार केली ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । निधी वाटपावरून महाविकास आघाडीवर नाराज असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी काल नवी दिल्लीत काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेटी घेवून नाराजीचा पाढा वाचल्याचे समजते.या भेटीत काँग्रेसच्या आमदारांनी काँग्रेसच्या एका बड्या मंत्र्यांची तक्रार केल्याची समजते.

निधी वाटपावरून आणि पक्ष संघटनेतील कामकाजावरून नाराज असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी काल नवी दिल्लीत काँग्रेसच्या पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेवून चर्चा केली.या भेटीत काँग्रेसच्या आमदारांनी राज्यातील काँग्रेसच्या काही मंत्र्यांची तक्रार केली असल्याची चर्चा आहे.मिळालेल्या माहितीनुसार,काँग्रेस पक्षात राज्यात कुठलाही समन्वय नसल्याची तक्रार या आमदारांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली.राष्ट्रवादीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आमदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतात मात्र काँग्रेसचा एकही मंत्री असा पुढाकार घेत नसल्याचे या आमदारांनी सांगितल्याचे समजते.काँग्रेसच्या आमदारांना पुरेसा निधी मिळत नाही.मात्र मंत्री आपल्या मतदारसंघासाठी निधी घेतात आणि इतर काँग्रेस आमदारांना वाऱ्यावर सोडतात अशीही तक्रार यावेळी करण्यात आल्याची चर्चा आहे.मिळालेल्या माहितीनुसार या नाराज आमदारांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांची तक्रार पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे केली असल्याचे समजते शिवाय विधानसभा अध्यक्षाच्या घोळावरूनही सोनिया गांधी नाराज असल्याचे समजते.

Previous articleपंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीत काय चर्चा झाली ? शरद पवारांनी दिली माहिती
Next articleविधान परिषदेसाठी इच्छुकांची जोरदार लाँबिंग ! कोणत्या पक्षाकडून कुणाला संधी मिळणार ?