मुंबई नगरी टीम
मुंबई । संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा सुमारे १८ हजार मतांनी पराभव केला आहे.मात्र या निवडणुकीत अपक्ष उमेदवार करूणा मुंडे काय चमत्कार करतात याकडे सर्वांच्या नजरा होत्या मात्र त्यांना केवळ १३३ मते मिळाली आहेत.या पोटनिवडणुकीच्या रिंगणात एकूण १५ उमेदवार आपले नशीब अजमावत होते.
कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत ( आण्णा ) जाधव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर करण्यात आला. पहिल्या फेरीपासूनच महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी आघाडी घेतली होती. ती शेवट पर्यंत होती.संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम यांचा १८ हजार मतांनी पराभव केला.काँग्रेसच्या उमेदवारांच्या या विजयामुळे महाविकास आघाडीत जल्लोषाचे वातावरण असले तरी सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या अपक्ष उमेदवार करूणा मुंडे यांनी या निवडणुकीत किती मते घेतली याचीच चर्चा सध्या सर्वत्र आहे.राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आलेल्या करूणा मुंडे या निवडणुकीत काय चमत्कार करणार याचीच चर्चा कोल्हापूरात होती.या पोटनिवडणुकीत एकूण १५ उमेदवार आपले नशीब अजमावत होते.महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांना ९६ हजार १७६ तर भाजपचे उमेदवार ७७ हजार ४२५ मते मिळाली. नोटाला सुमारे १७०० मते मिळाली तर करूणा धनंजय मुंडे यांना १३३ मते मिळाली आहेत.या निवडणुकीत त्यांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. इतर बारा उमेदवारांना तीनशेच्या आतच मते मिळाली आहेत.या सर्व उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.