महाविकास आघाडीत पुन्हा धूसफुस; निधी मिळत नसल्याची काँग्रेस आमदारांची तक्रार

मुंबई नगरी टीम

मुंबई । काँग्रेसचे पालकमंत्री स्थानिक आमदारांशी समन्वय ठेवत नसल्यामुळेच काँग्रेसच्या आमदारांना विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याची तक्रार आज झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत काँग्रेसच्या आमदारांनी केली. त्याचबरोबर असलेल्या समित्यांमध्ये वाढविण्याची मागणीही यावेळी या आमदारांनी केली.काँग्रेस आमदारांच्या तक्रांरीमुळे महाविकास आघाडीतील धुसूफूस पुन्हा चव्हाट्यावर आली असल्याची जोरदार चर्चा आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक झाली.या बैठकीत आमदार जिग्नेश मेवाणी यांच्यावरील बेकायदेशीर कारवाईसंदर्भात चर्चा करण्यात आली. जिग्नेश मेव्हणी यांच्यावरील कारवाईबाबत या बैठकीत चर्चा परंतु काँग्रेस पक्षाच्या आमदारांनी निधी वाटपात त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा पुन्हा एकदा पाढा वाचला. ज्या जिल्ह्यात काँग्रेसचे पालकमंत्री आहेत, त्याठिकाणी पालकमंत्री स्थानिक आमदारांशी समन्वय ठेवत नाहीत. याबद्दल बहुतांश आमदारांनी केली. सर्व आमदारांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर थोरात यांनी आठवड्याला काँग्रेसच्या दहा आमदारांच्या गटागटाने बैठक असल्याचे सांगितले. त्याचबरोबर थोरात हे पक्षाच्या आमदारांशी चर्चा करणार असल्याचे ठरविण्यात आले.आमदारांनी मांडलेल्या तक्रारींचे करण्यासाठी चार ज्येष्ठ सदस्यांची करण्याचेही या बैठकीत ठरविण्यात आले.

Previous articleचांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर,अनिल देशमुखांना क्लीन चिट मिळणार का ?
Next articleराज्यात पुन्हा गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती ; आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती