इंधन दरांवरुन पंतप्रधानांनी महाराष्ट्रासह बिगर भाजप शासित राज्यांना फटकारले

मुंबई नगरी टीम

मुंबई । देशात कोरोना रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा बैठक घेतली.या बैठकीत नरेंद्र मोदी यांनी इंधन दरांवरुन महाराष्ट्रासह तेलंगणा,आंध्र प्रदेश,तामिळनाडू,केरळ, झारखंड,पश्चिम बंगाल या राज्यांना खडेबोल सुनावले.देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी करून जनतेला लाभ द्यावा असा सल्लाही पंतप्रधानांनी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना दिला.

पंतप्रधान मोदींनी आज सर्व मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधत कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.मात्र हा आढावा घेत असतानाच पंतप्रधान मोदींनी इंधनवारील व्हॅट कमी न करण्या-या राज्यांची नावे घेवून व्हॅट कमी करण्यासाठी विनंती केली.मी कोणावर टीका करत नसून विनंती करत आहे. त्या राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी सांगत आहे असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.या बैठकीत त्यांनी तेलंगणा, आंध्र प्रदेश,तामिळनाडू,केरळ,झारखंड,महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या बिगर भाजप शासित राज्यांना इंधन दरांवरुन खडेबोल सुनावले.नोव्हेंबर महिन्यात सर्वांना व्हॅट कमी करण्यासाठी विनंती केली होती. मी कोणावर टीका करत नाही तर विनंती करत आहे असे सांगून,या राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी सांगत आहे.व्हॅट कमी करण्याच्या सूचना देवूनही तेलंगणा,आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ,झारखंड,महाराष्ट्र, आणि पश्चिम बंगाल या राज्यांनी ऐकलं नाही त्यामुळे या राज्यातील नागरिकांवरील ओझे कायम राहिले. या ७ राज्यांनी किती महसूल कमावला हे सांगायचे नाही. मात्र देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना या राज्यांनी व्हॅट कमी करत जनतेला दिला पाहिजे,असा सल्लाही यावेळी पंतप्रधान मोदींनी दिला.कोलकाता,हैद्राबाद, चैन्नई,मुंबई,जयपुर या शहरात इंधनाचे दर जास्त आहेत तर दिवदमण मध्ये दर कमी आहेत.त्यामुळे इंधनाचे दर कमी करा ही विनंती आहे असेही ते म्हणाले.

Previous articleमहाराष्ट्राला केंद्राकडून सापत्न वागणूक ; पंतप्रधानांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री संतापले !
Next articleमुंबई पोलीस आयुक्तांचा त्वरित राजीनामा घ्या; राज्यपालांकडे भाजपची मागणी