उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय राज ठाकरेंना आयोध्येत पाय ठेवू देणार नाही

मुंबई नगरी टीम

आयोध्या । मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे येत्या ५ जून रोजी आयोध्येचा दौरा करणार आहेत. मात्र त्यांच्या या दौ-याला उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी कडाडून विरोध केला असून, राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय त्यांना आयोध्येत पाय ठेवू देणार नाही असा इशारा भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी दिला आहे.

येत्या ५ जून रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आयोध्येच्या दौ-यावर जाणार आहेत.मात्र त्यांच्या या दौ-याला भाजपकडून तीव्र विरोध होत आहेत.उत्तर प्रदेशातील भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे यांच्या दौ-यावर तीव्र विरोध केला आहे.खासदार बृजभूषण सिंह यांच्या या विरोधाला समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनीही पाठिंबा दिला आहे.राज ठाकरे यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी आयोध्येत संतांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला संतांसह ५० हजार लोक उपस्थित राहणार असल्याची माहिती बृजभूषण सिंह यांनी दिली. तर राज ठाकरे यांच्या दौ-याला संतांचाही विरोध असल्याचा दावा त्यांनी करून या बैठकीत राज ठाकरे यांच्या दौ-याला विरोध करण्यासाठी रणनीती ठरवली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.राज ठाकरे यांच्या दौ-याला विरोध केल्यानंतर महाराष्ट्रातून मनसेच्या कार्यालयातून फोन आल्याची माहितीही त्यांनी दिली. राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय त्यांना आयोध्येत पाय ठेवू देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.तर त्यांनी माफी मागितली तरी राज ठाकरेंच्या दौ-याला आपला विरोध कायम असेल असेही त्यांनी ठणकावले.

दरम्यान राज ठाकरे यांच्या दौ-याला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पाठिंबा दर्शविला आहे.राज ठाकरे यांच्या दौ-यापूर्वी आयोध्येतील वातावरण चांगलेच तापले आहे.आयोध्येत लावण्यात आलेले नकली हिंदुत्वाच्या आशयाचे बॅनर हटविण्यात आले आहे.

Previous article……तर आज राज ठाकरे सुध्दा मुस्लिम झाले असते : रामदास आठवले
Next articleआमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका ! राज ठाकरेंचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना इशारा