मुंबई नगरी टीम
जळगाव । केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या पुण्यातील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी महागाईच्या मुद्द्यावर आंदोलन करत घोषणाबाजी केली होती.त्यावेळी भाजपच्या पदाधिका-याने राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.यापुढे महाराष्ट्रात महिलेवर कुठल्याही पुरुषाने हात उभारल्यास त्याचा हात तोडून मी त्याच्याच हातात देईल असा खणखणीत इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला आहे..
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या उपस्थितीत काल पुण्यात एक कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात महागाईच्या विरोधात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजी केली.यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित असणा-या भाजपच्या एका पदाधिका-याने या घोषणाबाजी करणा-या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली.या वरून राजकीय आरोपप्रत्यारोप केले जात आहेत.या प्रकरणावरून राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे.यापुढे महाराष्ट्रात महिलेवर कुठल्याही पुरुषाने हात उगारल्यास त्याचा हात तोडून मी त्याच्याच हातात देईल असा इशारा त्यांनी दिला.जळगावमध्ये महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन आयोजित केले होते.यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थितीत होत्या.त्यावेळी त्यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला.हा शाहु-फुले-आंबेडकर यांचा महाराष्ट्र असून,राज्यातील सर्व महिलांचा सन्मान करण्याची शिकवण आम्हाला मिळाली आहे. आता यापुढे या राज्यात अशी घटना घडल्यास मी स्वत: तिथे जाईन आणि त्याविरोधात कोर्टात जाईल. त्याचा हात तोडून त्यांच्या हातात देईल,असा इशारा त्यांनी दिला.