उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंना एकत्र आणा ! राज्यातील असंख्य शिवसैनिकांचे फोन

मुंबई नगरी टीम

मुंबई । शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपा सोबत युती करायची होती,तेव्हा त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले होते असे नाही.त्यामुळे आम्ही भाजपासोबत केलेल्या युतीनंतर आम्हाला विश्वासघातकी किंवा गद्दार का म्हणतात ? असा सवाल शिंदे गटाचे प्रमुख प्रवक्ते दीपक केसरकर यांनी उपस्थित केला आहे.तर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणा,असे अनेक शिवसैनिकांचे मला फोन येतात,अशी माहितीही त्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

नारायण राणे यांच्या सोबत एका मुद्द्यावर वाद झाले होते.मात्र आता आमच्यामध्ये कोणतेही वाद नाही असे सांगतानाच,जेव्हा जेव्हा आमची भेट होते, तेव्हा मी आदराने वागतो असे स्पष्ट करून, जिल्ह्यात नारायण राणे यांच्यासोबत काम करण्याची वेळ आली तर तयार असल्याचे मत शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकर यांनी व्यक्त केले. मी केलेल्या प्रत्येक बोलण्याचा अर्थ राणेंशी जोडणे चुकीचे आहे असे सागून, भविष्यात पत्रकार परिषदेत मी राणेंचे नाव घेणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. आम्ही एकनाथ शिंदे यांच्या साथीने जे केले ते लोकांना मान्य आहे. माझा आणि नारायण राणे यांचा वाद जगाने पाहिला आहे. मी आयुष्यात काही तत्व पाळतो, त्यामध्ये मी पवारांचे नाव कधी घेतले नाही. तसेच राणेंचे नाव देखील घेणार नाही.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भाजपसोबत युती करायची होती.तेव्हा त्यांनी आम्हाला विश्वासात घेतले होते असे नाही.त्यामुळे आम्ही भाजपासोबत केलेल्या युतीनंतर आम्हाला विश्वासघातकी किंवा गद्दार का म्हणतात ? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला. राज्यातील अनेक शिवसैनिकांचे मला फोन येतात की, उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणा,मात्र हे प्रयत्न मी केले आहेत.जेवढा पुढाकार घ्यायचा तेवढा घेतला, मात्र कालचे आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया बघितली तर पेपर नॅपकीन वापरुन फेकावे असे होते. असेही केसरकर म्हणाले.राष्ट्रवादी आणि काँग्रेसबाबत तुन्हाला प्रेम असेल तर तो तुमचा प्रश्न आहे.मुंबई महापालिकेत भाजपाने शिवसेनेला बिनशर्त पाठिंबा दिला होता.तुम्ही स्वप्नात वावरत आहात, अजूनही वेळ गेलेली नाही तुम्ही जमिनीवर या, असे आवाहनही यावेळी केसरकर यांनी केले.

Previous articleराज्यात महाविकास आघाडीचे सरकार नव्हे तर हिंदुत्व जपणारे सरकार : राणेंचा गंभीर इशारा
Next articleआज विस्तार : शिंदे गट आणि भाजपकडून जुन्याच चेह-यांना संधी,कुणा कुणाला मंत्रीपद मिळणार ?