शरद पवारांची प्रकृती ठीक,उद्या शिर्डीतील शिबीराला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी तीन दिवसांची सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे ब्रीच कॅंडी रुग्णायात उपचार घेत होते.आता शरद पवार यांची प्रकृती ठीक असल्याने ते उद्या शिर्डी येथे सुरू असलेल्या पक्षाच्या शिबीराला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकती ठीक नसल्याने डॉक्टरांनी त्यांना तीन दिवस सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला दिला होता.त्यानुसार ते मुंबईच्या ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल झाले होते.त्यांना २ नोव्हेंबरला डिस्चार्ज देण्यात येणार होता. नियोजित कार्यक्रमानुसार ते काल शिर्डीतील शिबीराला उपस्थित राहणार होते.मात्र त्यांना रूग्णालायातून डिस्चार्ज देण्यात आला नसल्याने त्यांनी रूग्णालयातूनच शिर्डीत सुरू असलेल्या मंथन,वेध भविष्याचा’ शिबिराला दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन केले.मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती ठीक असल्याने ते उद्या शनिवारी शिबीराला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.शरद पवार हे उद्या (शनिवारी) ५ नोव्हेंबर रोजी सकाळी मुंबईहून हेलिकॉप्टरने शिर्डी येथे दाखल होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेमध्ये प्रचंड राग;अजित पवारांनी व्यक्त केली जनभावना
Next article……..नाहीतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते ! आदित्य ठाकरे