मुंबई नगरी टीम
अहमदनगर । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे लोकल गाडी असून, हात दाखवा गाडी थांबवा अशी स्थिती आहे ते सामान्यांचे असल्यामुळे लोकप्रिय आहेत अशा शब्दात राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्तुती केली आहे.यावेळी त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावरही हल्लाबोल केला.
अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा ३६ वा पदवीदान राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.त्यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजे लोकल गाडी, हात दाखवा गाडी थांबवा अशी स्थिती आहे. ते सामान्यांचे आहेत.त्यामुळेच लोकप्रिय आहेत अशी स्तुती केली.मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर कार्यकर्त्यांचा विश्वास आहे.अनेक पक्षातील लोक कामावर खुश आहेत.गतीमान सरकार चालवत आहेत.जनतेचा मुख्यमंत्री म्हणून सहज उपलब्ध होणारे अशी त्यांची ओळख आहे असेही ते म्हणाले.यावेळी त्यांनी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलेल्या टाकेलाही प्रत्युत्तर दिसे.आमदार वाणी असते तर गद्दारांना त्यांनी बुटानेच मारले असते अशी टीका अंबादास दानवे यांनी केली होती.ज्यांनी ज्यांनी दोन बायका केल्या त्यांना बुटानेच हाणलं पाहिजे. त्यांना दोन बायका करण्याचा धर्माने अधिकार दिलाय का ? जर अधिकार असेल तर मारू नका,नसेल तर त्यांना जरूर मारा असेही मंत्री सत्तार यावेळी म्हणाले.