१८ डिसेंबरला भुजबळांच्या जामीन अर्जाचा फैसला

१८ डिसेंबरला भुजबळांच्या जामीन अर्जाचा फैसला

मुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गेल्या दीड वर्षांपासून कारागृहामध्ये असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जाचा फैसला येत्या १८ डिसेंबरला होणार आहे.

राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या नव्या जामीन अर्जावरील युक्तिवाद आज पूर्ण झाला.महाराष्ट्र सदन घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी सक्त वसूली संचालनालयाने भुजबळांवर गुन्हा दाखल केल्यापासून ते कारागृहामध्ये आहेत. ‘मनी लॉन्ड्रिंग’विरोधी कायद्यामधिल कलम ४५ रद्द झाल्याने छगन भुजबळ यांच्या जामिनाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यामुळे त्यांनी पीएमएलए कोर्टात जामिनासाठी धाव घेतली. कलम ४५ रद्द झाल्यामुळे जामीन द्यावा अशी मागणी भुजबळांच्या वकिलांनी केली आहे. म आज छगन भुजबळ आणि समीर भुजबळ यांच्या नव्या जामीन अर्जावरील युक्तिवाद पूर्ण झाला. पीएमएलए कोर्ट आता  भुजबळांच्या जामिनावर
येत्या १८ डिसेंबरला फैसला होणार आहे.

Previous articleआरे पुल १५ जानेवारीपासून वाहतुकीसाठी खुला होणार
Next articleरिफायनरी विरोधी आंदोलनामुळे सेनेचा दुटप्पीपणा उघड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here