मुंबई नगरी टीम
जळगाव : डान्सबार बंदीबाबत न्यायालयात भक्कम बाजु मांडण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप राष्ट्रवादीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी जळगाव येथील पत्रकार परिषदेत केला.
सरकारने मराठा आरक्षण दिले परंतु ते आरक्षण न्यायालयात टिकेल याकडे लक्ष द्यावे. त्यासाठी तज्ज्ञ वकीलांची टीम द्यावी आणि सरकारने विशेष लक्ष घालावे असेही अजित पवार यांनी सांगितले. निर्धार परिवर्तनाची यात्रा आज जळगावमध्ये आहे उद्या विदर्भ आणि नंतर मराठवाड्यात जाणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. शेतकरी समाज आज अडचणीत आला आहे,बेरोजगारी वाढलेली आहे . ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्याकडे सरकार लक्ष देत नाही असा आरोपही पवार यांनी केला.
आम्ही लोकांनी सुद्धा अर्थमंत्रालयाचा कारभार सांभाळला आहे. त्यातले बारकावे आम्हाला माहित आहेत आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात कॅबिनेट घेवून जाहीर केले की विविध समाजासाठी ७०० कोटी देवू परंतु ते पैसे अधिवेशनात पुरवणी मागण्या मांडल्याशिवाय मंजूर कसे होईल. हा एक चुनावी जुमला आहे. निवडणूक जवळ आल्या की हे सरकार अशा फसव्या घोषणा करत आहेत असेही पवार म्हणाले.