चार वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या
मुंबई : राज्य सरकारने आज चार वरिष्ठ सनदी अधिका-यांच्या बदल्या केल्या असून, सुरज मांढरे यांची नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे यांची नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रम कुमार यांची बदली करण्यात आली आहे.नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी.यांची महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर संदिप राठोड यांची बदली अतिरिक्त आयुक्त आदिवासी, नागपूर येथे करण्यात आली आहे.