राजेंद्र गावीतांना शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजाचा पाठिंबा

राजेंद्र गावीतांना शेषवंशीय क्षत्रिय भंडारी समाजाचा पाठिंबा

मुंबई नगरी टीम 

पालघर :  जिल्ह्यातील कुणबी, आगरी, आदिवासी अशा अनेक समाज घटका पाठोपाठ आता शेषवंशीय क्षत्रिय देवकर भंडारी समाजाने महायुतीचे उमेदवार  राजेंद्र गावीत  यांना पाठिंबा जाहीर केला आहे.विकासाच्या मुद्द्यावर हा पाठिंबा दिल्याचे या समाजाच्यावतीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

शेषवंशीय क्षत्रिय देवकर भंडारी समाजाच्या  शिष्टमंडळाने राजेंद्र  गावीत यांच्या निवासस्थानी भेट घेवून या पत्रकाची प्रत दिली. डहाणू येथील आंबेमोरा या ठिकाणी झालेल्या शेषवंशीय क्षत्रिय देवकर भंडारी समाजाच्या बैठकीत गावीत यांना पाठिंबा देण्याचा  निर्णय घेण्यात आला.गेल्या पाच वर्षात पंतप्रधान मोदी यांनी ज्या पद्धतीने विकास कामांचा धडाका लावला आहे त्यामुळे कधी नव्हे ती देशाची मान अवघ्या जगाच्या व्यासपीठावर उंच झाली आहे. त्यामुळे मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी एकेक खासदार महत्वाचा असल्यामुले गावीत यांनी पाटिंबा देणे गरजेचे असल्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. गावीत हे सर्वसामान्याशी नाळ जोडलेला नेता असून,या सर्व बाबींचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे शेषवंशीय क्षत्रिय देवकर भंडारी समाजाच्या  पत्रकात म्हटले आहे.

Previous articleहा माणुस काय करेल माहित नाही
Next articleसरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा