प्रकाश आंबेडकरांनी वंचितचा राजीनामा द्यावा : लक्ष्मण मानेंची मागणी
मुंबई नगरी टीम
मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणूक एमआयएम बरोबर युती केल्यामुळे चर्चेत आलेल्या वंचित आघाडीला घर घर लागण्यास सुरुवात झाली आहे . बी.जी कोळसे पाटील ,इंद्रकुमार भिसे मिलिंद पखाले यांच्या नंतर आता पद्मश्री लक्ष्मण माने यांनी बंड केले आहे. प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.
आंबेडकरवाद्यांच्या कळपात आरएसएसचे लोक कशाला असा सवाल करीत माने यांनी प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीचा दुरुपयोग करत आहेत. संघ आणि आरएसएसच्या लोकांनी वंचित बहुजन आघाडी व्यापून टाकली आहे. वंचित बहुजन आघाडी ही खरी आमची आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनी तात्काळ राजीनामा द्यावा . आम्ही राज्यभर खपलोय असून पदरचे पैसे घालून काम केलेले आहे. तर हे आयत्या बिळावरचे नागोबा आहेत या शब्दात माने त्यांनी वंचितचे सरचिटणीस गोपीचंद पडळकर यांना लक्ष्य केले आहे. लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने काँग्रेस-राष्ट्रवादी किंवा इतर पक्षांशी आघाडी करायला हवी होती. लोकसभा निवडणुकीत आमच्यामुळे दहा जागा गेल्या असा गौप्यस्फोट त्यांनी केला.
दरम्यान लक्ष्मण माने यांचा बोलविता धनी वेगळाच आहे. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंध आहे अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर यांनी केली.