श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष व कार्यपद्धती सुधारणेसाठी समिती

श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष व कार्यपद्धती सुधारणेसाठी समिती

मुंबई नगरी टीम

मुंबई : राज्य सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या श्री शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारांचे निकष व कार्यपद्धती सुधारण्यासाठी व हे पुरस्कार सर्व खेळांचा समावेश करणारे व्हावेत म्हणून अभ्यास करण्यासाठी समिती गठित करण्यातचे निर्देश आज शालेय शिक्षण युवक कल्याण व क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी दिले. या समितीला अहवाल देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

क्रीडा क्षेत्रात प्राविण्य मिळवलेल्या व्यक्तींना राज्य शासनातर्फे दरवर्षी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. या पुरस्कारांमध्ये ऑलिंपिक, कोमांवेल, एशियन गेम व्यतिरिक्त अन्य खेळांचाही समावेश व्हावा अशी मागणी गेली अनेक वर्ष करण्यात येत होती. या पुरस्कारांसाठी केवळ आजपर्यंत ३९ क्रीडा प्रकार विचारात घेतले जात होते. त्यामध्ये वाढ करून सर्व क्रीडा प्रकारांना सर्वसमावेशक हे पुरस्कार असावेत अशी क्रीडाप्रेमींची मागणी होती. तसेच ऑलिंपिक खेळातील पुरस्कार चक्राकार पद्धतीने दिले जात होते. त्याऐवजी ऑलिम्पिक खेळांना प्रतिवर्षी पुरस्कार दिला जावा , अशीही मागणी करण्यात येत होती गिर्यारोहणामध्ये शिखराची उंची निश्चित करावी, याबाबतही काही सूचना सरकारकडे आल्या होत्या. संघटक आणि एकलव्य पुरस्कारांबाबत ही काही सूचना नव्याने सरकारकडे क्रीडाप्रेमींनी केला होत्या. प्यारा ऑलम्पिक मध्ये असलेल्या सर्व खेळांचा शिवछत्रपती पुरस्कारा मध्ये समावेश करण्यात यावा, अशीही मागणी या क्रीडा प्रकारात तुन करण्यात येत होती. तसेच ही सर्व प्रक्रिया अधिक पारदर्शक व्हावी यासाठी स्पोर्ट्स पोर्टल अद्ययावत करावे अशी सूचनाही वारंवार क्रीडा प्रेमींकडून सरकारला प्राप्त झाली होती. या सर्व बाबी विचारात घेऊन शालेय शिक्षण व क्रीडामंत्री आशिष शेलार यांनी आज याबाबत तज्ञांची समिती गठीत करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. ही समिती येत्या आठ दिवसात गठीत करण्यात यावी असे निर्देश ही मंत्र्यांनी दिले आहेत.या समितीला आपला अहवाल देण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत देण्यात आली आहे.

Previous articleमी शिवसेनेत जाणार नाही : छगन भुजबळ
Next articleवरळीचा पुढचा आमदार मीच असेन : सुनील शिंदे