गोपीचंद पडळकरांची वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी

गोपीचंद पडळकरांची वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी

मुंबई नगरी टीम

मुंबई: वंचित बहुजन आघाडीचे नेते व प्रकाश आंबेडकर यांचे निकटचे सहकारी गोपीचंद पडळकर यांनी वंचित बहुजन आघाडीचा राजीनामा दिला आहे. ते स्वगृही म्हणजेच भाजपात परतणार असल्याचे बोलले जाते.

 सांगलीचे माजी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राहिलेले गोपीचंद पडळकर हे संभाजी भिडे  यांचे जवळचे सहकारी मानले जातात. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ते वंचित बहुजन आघाडीत सहभागी झाले आणि त्यांनी सांगलीत लोकसभा निवडणूकही लढवली होती. ते वंचित बहुजन आघाडीचे महासचिव होते. वंचितच्यावतीने वाटाघाटी करण्यात ते आघाडीवर होते. कालच्या लातूरमधल्या वंचितच्या धनगर मेळाव्यालाही त्यांनी दांडी मारली होती. आज त्यांनी आपल्या सर्व पदांचा तसेच सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ते भाजपाच्या तिकिटावर खानापूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. पुढच्या दोन दिवसांत आपण आपली राजकीय भूमिका जाहीर करू, असेही त्यांनी सांगितले आहे.

Previous articleमुख्यमंत्र्यांना जनतेचा कळवळा नाही
Next articleभाजप १४४ शिवसेना १२६ ; युतीचा फॉर्म्युला ठरला ?