भाजप १४४ शिवसेना १२६ ; युतीचा फॉर्म्युला ठरला ?

भाजप १४४ शिवसेना १२६ ; युतीचा फॉर्म्युला ठरला ?

मुंबई ‌नगरी टीम

मुंबई :  जागा वाटपात निम्म्या जागांवर ठाम असलेल्या शिवसेनेला १२६ जागा देण्यावर एकमत झाल्याची चर्चा आहे .भाजपला १४४ तर मित्रपक्षांसाठी १८ जागा सोडण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते.आज दिल्लीत झालेल्या भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभा निवडणूकीत युती करणार असल्याचे संकेत दिल्यानंतर आज दिल्लीत झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत जागा वाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येते.राज्यातील भाजपाचे उमेदवार ठरवण्यासाठी भाजपच्या कोअर कमिटीची दिल्लीत बैठक झाली आहे. भाजपाध्यक्ष अमित शाह, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपचे कार्याध्यक्ष जेपी नड्डा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे या बैठकीला उपस्थिती होते.

आजच्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजप १४४, शिवसेना १२६ तर मित्रपक्षांसाठी १८ जागा सोडण्यात येणार आहेत. यापूर्वी १८ जागा मित्रपक्षांना सोडल्यानंतर शिवसेना-भाजपने निम्म्या निम्म्या म्हणजे १३५-१३५ जागा लढवाव्यात असा आग्रह शिवसेनेचा होता. शिवसेना आधीपासूनच ५०-५० जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाम होती.शिवसेना आणि भाजपने याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. परंतु येत्या रविवारी घटस्थापनेच्या दिवशी याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Previous articleगोपीचंद पडळकरांची वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी
Next articleआणि ….अजित पवार यांना अश्रू अनावर झाले !