विस्तारात केवळ तीन महिला मंत्र्यांचा समावेश

विस्तारात केवळ तीन महिला मंत्र्यांचा समावेश

मुंबई नगरी टीम

मुंबई : आज झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात केवळ तीन महिला आमदारांना मंत्रीपदी संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये दोन कॅबिनेट तर एक महिला राज्यमंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे.आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात शिवसेनेकडून महिला आमदारांना संधी देण्यात आली नाही.

काँग्रेसने यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादीचे खासदार सुनिल तटकरे यांच्या कन्या श्रीवर्धनच्या आमदार अदिती तटकरे यांना राज्यमंत्रीपदाची संधी दिली आहे.शिवसेनेने एकाही महिला आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही.शिवसेनेच्या दोन महिला आमदार निवडून आल्या आहेत.चोपडा मतदारसंघातून लता सोनावणे आणि भायखळा मतदारसंघातून यामिनी जाधव निवडून आल्या आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसकडून तासगाव मधून सुमनताई पाटील, श्रीवर्धनमधून अदिती तटकरे, देवळालीतून सरोज अहिरे विजयी झाल्या. त्यापैकी अदिती तटकरे यांना राज्यमंत्री म्हणून संधी देण्यात आली आहे.काँग्रेसमधून अमरावती मतदारसंघातून सुलभा खोडके,सोलापूर शहर मध्यतून प्रणिती शिंदे, वरोरा मतदारसंघातून प्रतिभा धानोरकर, तिवसा मतदारसंघातून यशोमती ठाकूर,धारावी मतदारसंघातून वर्षा गायकवाड निवडून आल्या आहेत. विजयी झाल्या. त्यापैकी यशोमती ठाकूर आणि वर्षा गायकवाड यांना कॅबिनेट मंत्रिपदाची संधी देण्यात आली आहे.

Previous articleअजित पवार उपमुख्यमंत्री; २६ कॅबिनेट,१० राज्यमंत्र्यांनी घेतली शपथ
Next articleजेव्हा राज्यपाल शपथविधी सोहळ्यात संतप्त होतात तेव्हा….