मुंबई नगरी टीम
मुंबई : पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ४० जवान शहीद झाले.या घटनेला आज एक वर्ष पूर्ण होत असतानाच पुलवामा हल्ल्याचे सत्य देशातील जनतेला जाणून घ्यायचे असल्यामुळे या हल्ल्याची चौकशी करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफच्या ४० जवान शहीद झाले .या हल्ल्यात आजपर्यंत आरडीएक्स कुठुन आले आणि वाहन घटनास्थळावर कसे पोहोचले याची चौकशी करण्यात आलेली नाही असेही मलिक म्हणाले. या वाहनाचा वाहन चालक तुरूंगात होता. तो कसा बाहेर आला? याची सत्यता जाणून घ्यायची असल्याने या घटनेची चौकशी केली पाहिजे अशी मागणी मलिक यांनी केली आहे. शहीद जवांनाचे हौतात्म्य वाया जाणार नाही, त्यांच्या कुटुंबीयांची काळजी सरकारतर्फे घेण्यात येवूनत्यांना पाच एकर जमिनीसह इतर मदत केली जाईल, अशा घोषणा केंद्र सरकारने केली होती मात्र या घटनेला वर्ष उलटूनही शहिदांच्या कुटुंबीयांना अजून मदत मिळाली नाही.
काय म्हणाले मंत्री मलिक
“आरडीएक्स कुठुन आले आणि वाहन घटनास्थळावर कसे पोहोचले याची चौकशी करण्यात आलेली नाही असेही मलिक म्हणाले. या वाहनाचा वाहन चालक तुरूंगात होता. तो कसा बाहेर आला? याची सत्यता जाणून घ्यायची असल्याने या घटनेची चौकशी केली पाहिजे”