मुंबई नगरी टीम
मुंबई : कोकण व पालघर जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते व कुणबी समाजाचे स्थानिक नेते मिलिंद मनोहर पाटील यांची कुणबी समाजाचे प्रतिनिधी म्हणून विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची मागणी विविध कुणबी संघटनांकडून शिवसेनेकडे करण्यात आली आहे.
विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त बारा जागांवर पुढील आठवड्यात नियुक्त्या होण्याची चिन्हे आहेत. विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त जागांवर यावेळेस यंदा घटनेच्या तरतुदीनुसार प्राधान्याने वाडःमय, कला, सामाजिक कार्य किंवा सहकार चळवळीत तज्ज्ञांची नियुक्ती करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र विकास आघाडीत चर्चा झाली आहे. त्यानुसार कुणबी समाजाचे प्रतिनिधी म्हणून मिलिंद मनोहर पाटील यांची नियुक्ती करण्याची मागणी सूर्यवंशी क्षत्रिय हितवर्धक मंडळ कुणबी समाजोन्नती संघ व सूर्यवंशी क्षत्रिय विद्यर्थी मंडळ या कोकणातील मातब्बर संस्थांनी महाराष्ट्र विकास आघाडीतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेकडे केली आहे.
आमचा संपूर्ण पालघर जिल्हा हा १९७७ सालापासून आदिवासी राखीव असल्यामुळे आम्हाला ४३ वर्षांच्या राजकीय वनवासाला सामोरे जावे लागले आहे. रत्नागिरीत जिल्ह्यात कसलेल्या जमिनीमध्ये बेदखल आणि ठाणे तसेच पालघर जिल्ह्यात राजकीयदृष्ट्या बेदखल असलेल्या कुणबी समाजाला न्याय देण्याकरिता मिलिंद पाटील यांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी या समाजाच्यावतीने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.