तुम्ही खाली बसा… मंत्री असाल तुमच्या घरी ! नीलम गोऱ्हेंनी मंत्री गुलाबराव पाटलांना झापलं

मुंबई नगरी टीम

मुंबई । आज विधानपरिषदेत पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील आपल्या नेहमीच्या स्टाईलमध्ये भाषण करत असताना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना काही सूचना करण्याचा प्रयत्न केला.मात्र पाटील यांनी उपसभापती ताई आपण मध्ये बोलू नका,असे म्हणत त्यांनी उपसभापती यांच्याकडे हातवारे केले.गुलाबराव पाटील यांच्या या कृतीमुळे उपसभापती नीलम गोऱ्हे चांगल्याच संतापल्या आणि तुम्ही आताच्या आता खाली बसा असा आदेश देत,तुमची ही बोलायची पद्धत आहे का ? छाती बडवून विधान परिषदेत काय बोलता,बसा खाली,मंत्री असाल तुमच्या घरी,अशा शब्दात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना झापलं.

विधानपरिषदेत आज कामकाजाच्या वेळी शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी शिक्षकांच्या निधीचा प्रश्न उपस्थित केला होता.या विषयावर चर्चा सुरू असताना राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना प्रश्न विचारण्यात आला.हा प्रश्न उपस्थित करण्यात आला त्यावेळी पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी काली बसून काही कुजबुज करीत होते.ही गोष्ट उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या लक्षात येताच त्यांनी खाली बसून बोलू नका, तुमची वेळ आल्यावर तुमचे म्हणणे मांडा, असे उपसभापती गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना सुनावले.त्यानंतर गुलाबराव पाटील यांनी मला बोलायचे आहे, असे म्हणत हातवारे केले आणि लगेच ते बोलायला उभे राहिले.शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी विधानपरिषदेत शिक्षकांच्या निधीवरुन प्रश्न विचारला. याचविषयी विधानपरिषदेत मग चर्चा सुरु झाली. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांना याच विषयावरुन प्रश्न विचारण्यात आला.त्यावर खाली बसून गुलाबराव पाटील काहीसे कुजबुजत होते.उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या ही बाब लक्षात आल्यावर त्यांनी गुलाबराव पाटील यांना पहिल्यांदा समजावले. खाली बसून बोलू नका, तुमची वेळ आल्यावर तुमचं म्हणणे मांडा, असे गोऱ्हे म्हणाल्या. त्यावर गुलाबरावांनी मला बोलायचे आहे, असे म्हणत हातवारे केले आणि बोलायला उभे राहिले.यावेळी बोलताना पाटील म्हणाले,शिक्षणमंत्री एका प्रश्नाला उत्तर देत असताना विरोधीपक्ष नेते म्हणाले की एक मंत्री दादागिरी करत होता,मी त्यावेळी मंत्री होतो,अनिल परब यांना विचारा तेही मंत्री होते, एसटीचा पगार देऊ शकले नाहीत असे मुद्दे पाटील मांडत असताना त्यांनी आपल्या नेहमीच्या स्टाईलने छातीवर हात मारला.पाटील यांचा हा आवेश पाहून उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी पाटील यांना थांबविण्याचा प्रयत्न केला.मात्र गुलाबराव पाटील यानंतर चांगलेच संतापले आणि त्यांनी उपसभापती यांना हातवारे करत मध्ये बोलू नका असे सांगितले.

गुलाबराव पाटील यांचा हा आक्रमक पवित्रा पाहून उपसभापती नीलम गोऱ्हेंना राग अनावर झाला आणि त्यांनी पाटील यांना चांगलेच सुनावले. ही सभागृहात बोलण्याची पद्धत नाही,पुन्हा हात वर करतात की मला बोलायचे आहे आणि माझ्याकडे बघून हातवारे करताय, तुमचे म्हणणे काय आहे हे रेकॉर्डवर घ्या, तुम्ही कोणाला इशारा करताय,तुम्ही लगेच खाली बसा आणि तुमचे निवेदन थांबवा असे उपसभापतींनी सुनावले.मंत्रीमहोदय ही पद्धत नाही,तुमच्या विभागाचा निषेध होत नाही,मी तुम्हाला ताकीद देत आहे, दीपक केसरकर यांच्या शिक्षण विभागाचा प्रश्न आहे,तेव्हा तुम्ही मंत्रिमंडळ बैठकीत काय करत होता त्याचा आता काय संबंध आणि काय छातीवर हात आपटून वगैरे बोलत आहात,खाली बसा,ही वागायची पद्धत नाही,बसा खाली,मंत्री असाल तुमच्या घरी,अशा शब्दात उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गुलाबराव पाटील यांना सुनावले या प्रकारमुळे काही वेळेसाठी सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याने सभागृहाचे कामकाज ५ मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

 

Previous articleमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून राज्यात दररोज तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या !
Next articleआज सर्व गोष्टींवर जीएसटी आहे फक्त भाषणावर जीएसटी नाही : भुजबळांचा टोला