उद्यापासून राज्यातील थिएटर्स,नाट्यगृह आणि मल्टिप्लेक्स सुरू होणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : अनलॉक प्रक्रियेअंतर्गत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कंटेन्मेंट झोनबाहेरील सर्व थिएटर्स,नाट्यगृह, मल्टिप्लेक्स उद्या ५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार ५० टक्के क्षमतेसह थिएटर्स, नाट्यगृह,मल्टिप्लेक्स सुरू करता येणार आहेत.तब्बल आठ महिन्यांपासून बंद असलेले थिएटर्स अखेर उघडणार आहेत. यासह स्विमिंगपूल,बॅडमिंटन,टेनिस, शूटिंग रेंज आदी इनडोअर खेळांना देखील परवानगी देण्यात आली आहे.

राज्य सरकारने आज यासंदर्भातील आदेश जारी केला असून त्यात थिएटर्स, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स उघडण्याची परवानगी देण्यात आली आहेत. त्यातही ५० टक्के प्रेक्षक क्षमतेची अट घालण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोनबाहेरील थिएटर्स,नाट्यगृहांवर अद्यापही बंदी कायम आहे. अनलॉकच्या पार्श्वभूमीवर हळूहळू अनेक अस्थापनांना संमती दिली जात आहे. थिएटर्स सुरू करण्यात येणार असले तरी कोरोना संदर्भातील सर्व खबरदारीचे नियम पाळणे बंधनकारक असणार आहे. त्याशिवाय स्विमिंग पूल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळणाऱ्या जलतरणपटूंसाठीच स्विमिंग पूल सुरू करता येणार आहे. यामध्ये सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे लागणार आहे.

यासह कंटेन्मेंट झोनबाहेरील योगा इन्स्टिट्यूट देखील सुरू करण्याची परवानगी आहे.त्यानुसार ५ नोव्हेंबरपासून योगा प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार असून त्यांनाही नियम पाळणे बंधनकारक असेल. इनडोअर खेळांनाही परवानगी देण्यात आली आहे. तर कंटेन्मेंट झोनमध्ये या सर्वांवर आद्यपही निर्बंध आहेत. दरम्यान, ठाकरे सरकारने अनलॉक ५ मध्ये राज्यातील हॉटेल आणि रेस्तराँ ५० टक्के क्षमतेने सुरू करण्याची परवानगी दिली होती.तर आता थिएटर्स,नाट्यगृहांना परवानगी दिल्याने थिएटर्स मालकांना दिलासा मिळाला आहे.

Previous articleपुणे पदवीधर मतदारसंघातून मेधा कुलकर्णी यांना भाजपकडून उमेदवारी ?
Next articleठाकरे सरकारची हुकुमशाही प्रवृत्ती खपवून घेणार नाही : प्रविण दरेकरांचा इशारा