राज्यातील महाविद्यालये बंद की सुरू राहणार ? उद्या होणार निर्णय

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असतानाच आता राज्यातील महाविद्यालये सुरू ठेवायची की बंद याबाबतचा निर्णय उद्या बुधवारी जाहीर करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च वव तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.

मुंबईसह महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढत आहे.या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय मुंबईसह ठाणे,नवी मुंबई आणि पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत आज सर्व विभागीय आयुक्त,राज्यातील सर्व जिल्हाधिकारी,सर्व कुलगुरू यांच्या समवेत ऑनलाईन बैठक पार पडली,कोरोनाबाबत प्रत्येक जिल्ह्याचा आढावा या बैठकीत घेण्यात आला,विद्यार्थीं, पालक,प्राध्यापक व कर्मचारी यांनी सुरक्षिततेबद्दल चर्चा करण्यात आली.त्यानुसार राज्यातील महाविद्यालये बंद की सुरू ठेवायची याचा निर्णय उद्या बुधवारी दुपारी ४ वाजता जाहीर करू अशी माहिती सामंत यांनी दिली.

Previous articleमाझ्या विरोधातील कारवाई सुडबुध्दीने, उच्च न्यायालयात दाद मागणार
Next articleमहाविद्यालये येत्या १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार; परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेणार