मुंबई नगरी टीम
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटूंब आणि अन्वय नाईक परिवाराचे जमिनी व्यवहार संबंधीचे असलेल्या आर्थिक व्यवहारासंदर्भात भाजपचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर आरोप केले होता.यानंतर आता निवडणूक आयोग आणि महसूल विभागाकडे मुख्यमंत्री ठाकरे यांनी संपत्ती लपविल्याची तक्रार करणार असल्याची माहिती सोमय्या यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कुटूंब आणि अन्वय नाईक यांचे जमिनी व्यवहार संबंधीचे असलेल्या आर्थिक व्यवहाराबाबत खुलासा केल्यानंतर शिवसेनेच्या डझनभर नेत्यांनी यासंबंधी मला धमक्या दिल्या होत्या.तर प्रवक्त्यांनी तर शेवटची याबाबत तंबी दिली असल्याचा गौप्यस्फोट सोमय्या यांनी केला.एवढे असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परिवाराचे अपारदर्शक जमिनी, बिल्डर, आर्थिक व्यवहार जनते पुढे आणण्याचे आमचे काम सुरूच आहे आणि राहणार असेही त्यांनी सांगितले.नोव्हेंबर मध्ये ठाकरे,नाईक परिवाराचे जमिन व्यवहार उघडकीस आणल्यानंतर १२ नोव्हेंबर, २०२० रोजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मी उद्धव ठाकरे यांनी २१ मार्च, २०४ ते १२ नोव्हेंबर, २०२० पर्यंतच्या त्या जमिनीवरील १९ घरांचा,घरपट्टी कर व अन्य कर १२ नोव्हेंबरला आरटीजीएसद्वारे कोर्लई ग्रामपंचायत यांच्या खात्यात भरला असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे परिवारांने सहा वर्षे अन्वय नाईक कडून घेतलेली १९ घरे ज्यांचे एकूण क्षेत्रफळ २३ हजार ५०० वर्ग फूट व ज्याची ग्रामपंचायत,राज्य सरकार रेडिरेकनर प्रमाणे मूल्य रुपये ५.२९ करोड असून हा आर्थिक व्यवहार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा वर्ष लपवला आहे.सहा वर्ष ही १९ घरे, रुपये ५.२९ कोटीची संपत्ती ही उद्धव ठाकरे परिवाराचे बेनामी म्हणून अन्वय नाईक यांच्या नावाने पडून होती.उद्धव ठाकरे यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रकात या संपत्तीचा,त्यांची १९ घरे २३,५०० स्केअर फूटची घरे ही त्यांनी दाखविलेली नाही.रश्मी उद्धव ठाकरे यांच्या नावाने या प्रतिज्ञापत्रकात फक्त अन्वय नाईक परिवाराकडून तीस जमिनीचे फक्त आर्थिक व्यवहार झाले असल्याचे त्यांनी भासवले असून, उद्धव ठाकरेंनी ही एवढी घरे, संपत्ती ही जनतेपासून लपवली असल्याचा आरोप सोमय्या यांनी करून या प्रकरणी सोमवारी निवडणूक आयोग व महसूल विभागाकडे तक्रार दाखल करणार असल्याचे सांगितले.