१४ महानगरपालिकांच्या निवडणुकांसदर्भात निवडणूक आयोगाने दिले महत्वाचे आदेश

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यातील मुंबई,ठाणे,पुणे,नागपूर,अमरावती,नवी मुंबई वसई विरार उल्हासनगर कोल्हापूर अकोला सोलापूर नाशिक,पिपंरी चिंचवड,कल्याण डोंबिवली या १४ महानगरपालिकांच्या आयुक्तांना राज्य निवडणूक आयोगाने पत्र पाठवून येत्या १७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत.

४ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने १० मार्च रोजी ज्या टप्प्यावर निवडणुकांची प्रक्रिया स्थगित केली होती तेथून पुढे सुरूवात करून निवडणूक कार्यक्रम घोषीत करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाने महानगरपालिका निवडणुकांसदर्भात पालिका आयुक्तांना महत्वाचे आदेश दिले आहेत.मुंबईमहानगपालिकेसह नवी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली,उल्हासनगर,वसई-विरार,पुणे,पिंपरी चिंचवड,कोल्हापूर, अमरावती,नागपूर,अकोला,सोलापूर आणि नाशिक या १४ महापालिकांनी मुदत यापूर्वीच संपलेली असून या महापालिकांच्या सार्वत्रिक निवडणूक केवळ इतर मागास वर्गाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याने पुढे ढकलण्यात आलेल्या आहेत.मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतर इतर मागास वर्गास राजकीय आरक्षण मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरु करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगानेही ही प्रक्रिया सुरु केली आहे. प्रारूप प्रभाग रचनेस राज्य निवडणूक आयोगाने २८ जानेवारी रोजी मान्यता दिल्यानंतर १ फेब्रुवारी ते १४ फेब्रुवारी दरम्यान त्यावर हरकती आणि सूचना मागविण्यात आल्या आहेत.या हरकती आणि सूचनांवर १६ ते १६ फेब्रुवारी दरम्यान सुनावणी घेऊन त्या अंतिम करण्यात आल्या आहेत मात्र त्यानंतर ४ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयाने या निवडणूक प्रक्रियेस स्थगिती दिल्याने अंतिम प्रारूप जाहीर करण्यात आले नव्हते.येत्या ११ मे अंतिम प्रभाग रचना काम पूर्ण करण्याचे तसेच १२ मे पर्यंत प्रभाग रचना अंतिम प्रस्ताव राज्य निवडणुक आयोगाकडे मान्यतेसाठी पाठवून,१७ मे रोजी अंतिम प्रभाग रचना अंतिम प्रसिद्ध करावी असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे आहेत.

Previous articleग्रामसेवक,ग्रामविकास अधिकारी पद रद्द होणार;पंचायत विकास अधिकारी पद अस्तित्वात येणार
Next articleकाँग्रेस राष्ट्रवादीचं बिनसलं ! राष्ट्रवादीनं पाठीत खंजीर खुपसल्याची नाना पटोलेंची टीका