मुंबई नगरी टीम
मुंबई । अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रायगड किल्ला व परिसराच्या विकासासाठी १०० कोटी देण्यात येणार आहे.राजगड,तोरणा,शिवनेरी,सुधागड,विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी १४ कोटी,मुंबईतील शिवडी व सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धन आराखड्यांसाठी ७ कोटी प्रस्तावित असल्याचे पवार यांनी जाहीर केले.
रायगड किल्ला व परिसर विकासाकरीता १०० कोटी तर राजगड,तोरणा,शिवनेरी,सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी १४ कोटी, मुंबईतील शिवडी व सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धन आराखड्यांसाठी ७ कोटींची आजच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे.तसेच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमीत्त वढु बुद्रुक व तुळापूरया परिसरात स्मारकासाठी २५० कोटी रुपये निधी उपलब्ध करणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले.त्याच बरोबर राज्यात छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना” सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.