अर्थसंकल्प : किल्ले रायगड व परिसर विकासाकरीता १०० कोटी

मुंबई नगरी टीम

मुंबई । अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात रायगड किल्ला व परिसराच्या विकासासाठी १०० कोटी देण्यात येणार आहे.राजगड,तोरणा,शिवनेरी,सुधागड,विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी १४ कोटी,मुंबईतील शिवडी व सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धन आराखड्यांसाठी ७ कोटी प्रस्तावित असल्याचे पवार यांनी जाहीर केले.

रायगड किल्ला व परिसर विकासाकरीता १०० कोटी तर राजगड,तोरणा,शिवनेरी,सुधागड, विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग या सहा किल्ल्यांसाठी १४ कोटी, मुंबईतील शिवडी व सेंट जॉर्ज किल्ल्यांच्या जतन व संवर्धन आराखड्यांसाठी ७ कोटींची आजच्या अर्थसंकल्पात प्रस्तावित करण्यात आले आहे.तसेच स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमीत्त वढु बुद्रुक व तुळापूरया परिसरात स्मारकासाठी २५० कोटी रुपये निधी उपलब्ध करणार असल्याचे पवार यांनी जाहीर केले.त्याच बरोबर राज्यात छत्रपती संभाजी महाराज शौर्य पुरस्कार योजना” सुरु करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous articleअर्थसंकल्पात अजितदादांची मोठी घोषणा ; सीएनजी स्वस्त होणार
Next articleकृषी,आरोग्य,मनुष्यबळ विकास,दळणवळण आणि उद्योगाला चालना देणारा ‘पंचसूत्री’ अर्थसंकल्प