घड्याळ्याचे बटन दाबायचे नाही आणि पैसे कधी मिळणार विचारता : अजित पवार

मुंबई नगरी टीम

पाथर्डी  :  आधी घड्याळाचे बटण दाबा… घड्याळाचे बटण दाबायचे नाही आणि आम्हाला पैसे का मिळाले नाही म्हणून आम्हाला विचारता. अहो त्या कमळाबाईला विचारा ना असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी  पाथर्डी येथील जाहीर सभेत लगावला.पवार यांचे सडेतोड भाषण सुरु असतानाच एक शेतकरी पैसे मिळत नाही अशी तक्रार करायला उभा राहिला. त्यावेळी अजितदादा पवार यांनी ही कोपरखळी केली.

जलयुक्त शिवाराचे हजारो गावे टँकरमुक्त झाली आहे असं सांगत आहेत कुठे झाली आहेत दाखवा आज पाथर्डी, शेवगावमध्ये १२३ गावात टँकरने पाणी का दिले जात आहे उत्तर द्या. या जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप  अजित पवार यांनी केला.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफी कशी झाली पाहिजे तर दोन महिन्यात कर्जातून शेतकऱ्याचा सातबारा कोरा झाला पाहिजे परंतु आज तसे होत नाही. नुसती पोकळ आश्वासनं, गाजरं दाखवून उपयोग नाही त्यासाठी काम केलं पाहिजे असा सल्लाही  पवार यांनी दिला. तुटपुंजी मदत देवून शेतकर्-यांची चेष्टा का करता आहात. अन्नधान्याने पवार साहेबांनी देशाला स्वयंपूर्ण केले आणि आज देशाची काय परिस्थिती आहे.

कांद्याचे वांधे करुन टाकले आहेत. एका शेतकर्‍याला कांदा विक्रीतून किती पैसे मिळाले याची पावती वाचून दाखवली. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या मृत्यूनंतर सर्वात मोठया शेतकरी जातीला अदयाप कृषीमंत्री सरकारने दिलेला नाही असेही  पवार म्हणाले. चारा छावण्यांबाबत सरकारने काढलेला जीआरचा समाचार दादांनी आपल्या भाषणात घेतला एखाद्या शेतकर्‍याकडे पाच सहा गुरे आहेत मग पाचच्या वर गुरे असतील तर शेतकऱ्यांनी बाकीची गुरं कुठे न्यायची. म्हणजे यांचे मंत्री राम शिंदे यांनी सांगितले तसे पाहुण्यांकडे गुरे नेवून बांधायची असेच सरकार करायला लावत आहे. शेतकऱ्यांच्या मुळावर का उठला आहात. तो सर्वांना जगवतोय. मंत्र्यांचे कारखाने आहेत त्यांनी एफआरपी दिली का. हे कुठल्या तोंडानी सांगणार आहात असा सवालही त्यांनी केला.

Previous articleपरवडणाऱ्या घरांबाबतही सरकारचे आश्वासन फोलच ठरले : सुप्रिया सुळे
Next articleशहिदांच्या कुटुंबीयांना मिळाली हक्काची शेतजमीन