युतीचे भिजत घोंगडे कशाला ? : प्रशांत किशोर

मुंबई नगरी टीम

मुंबई: पंतप्रधान मोदी यांचे चाणक्य प्रशांत किशोर आज अचानक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले.यामुळे अनेक तर्कवितर्क सुरू झाले.शिवसेनेची प्रचारनीती ठरवण्यासाठी किशोर यांना उद्धव ठाकरे यांनीच पाचारण केल्याची चर्चा होती.प्रत्यक्षात किशोर यांनी युतीसाठी मध्यस्थी केली,असे आता कळते आहे.

प्रशांत किशोर जेडीयूचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी काही जागांसाठी कशाला युतीचे भिजत घोंगडे ठेवता,असे ठाकरेंना विचारले असे समजते. नवरदेव तुम्ही,वऱ्हाडी तुम्ही,मग लग्न काही जागांसाठी कशाला लग्न थांबवता,असा सूचक सल्ला त्यांनी दिला.दोघांनीही चोवीस चोवीस जागा लढवल्यास वाईट काय आहे,असे त्यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे,उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे शिवसेनेचा चेहरा आहेत,असेही ते म्हणाल्याचे कळते.

तत्पूर्वी,२०१४ मध्ये भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रचंड यश मिळवून देण्यात अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेले प्रशांत किशोर यांनी आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.त्यांना मातोश्रीवर पाचारण करण्यात आले होते.यावेळी प्रशांत किशोर शिवसेनेचा प्रचार कसा करायचा ते ठरवतील,असा तर्क करण्यात येत होता.पण तोखोटाच ठरला.शिवसेनेचे निवडणूक नियोजन ते ठरवू शकतात किंवा भाजपशी युती करायची की नाही,याचाही निर्णय ते घेऊ शकतात,अशी शक्यताही वर्तवली गेली होती.आज शिवसेनेच्या सर्व खासदारांना युतीबाबत चर्चा करण्यासाठी बोलवण्यात आले होते.

निवडणूक प्रचाराचे व्यवस्थापन करण्यात प्रशांत किशोर हे तज्ञ समजले जातात.त्यांचे ट्रॅक रेकॉर्डही जबरदस्त आहे. गेल्या निवडणुकीच्या वेळेस त्यांच्या नियोजनामुळेच भाजप अभूतपूर्व यश मिळवू शकला,असा दावा केला जातो.पंतप्रधानांसाठी चाय पे चर्चा, थ्रीडी रॅली,सोशल मीडियावरील प्रचार यांचे सर्व नियोजन त्यांनीच केले होते.बिहार निवडणुकीत त्यांची मदत कॉंग्रेसने आणि जेडीयूने  घेतली होती.तेथे जेडीयूला चांगले यश मिळाले होते.

Previous articleप्रवीणने प्रमोद को क्यूं मारा ने राष्ट्रवादीचे प्रत्युत्तर
Next articleमुख्यमंत्र्यांची शिष्टाई यशस्वी !  अण्णा हजारे यांचे उपोषण मागे