नितिशकुमारांच्या पंतप्रधानपदासाठी प्रशांत किशोर मातोश्रीवर?

मुंबई नगरी टीम

मुंबई : मोदी यांचे निवडणूक रणनीतीकार आणि आता जेडीयूचे उपाध्यक्ष असलेले प्रशांत किशोर यांनी नुकतीच मातोश्रीवर हजेरी लावली.शिवसेनेचे प्रचार धोरण ठरवण्यासाठी ते आले असल्याचे वृत्त अगोदर पसरले.नंतर प्रशांत किशोर हे भाजपकडून युतीसाठी शिवसेनेला तयार करण्यासाठी आले असल्याचे वृत्त होते.मात्र आता एका वृत्तपत्राच्या दाव्यानुसार,जेडीयूचे नेते आणि बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांच्या पंतप्रधानपदासाठी शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्यासाठी त्यांचा हा दौरा होता.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किशोर यांच्या भेटीनंतर वेगळेच वक्तव्य केले होते.नीतिशकुमार यांच्या पंतप्रधानपदाला शिवसेनेने पाठिंबा द्यावा,अशी मागणी किशोर यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्याचे समजते. शिवसेनेचे प्रचार धोरण काय असावे,युती करावी की नाही याबाबत किशोर यांनी सल्ला दिल्चाच्या वृत्ताला शिवसेनेकडून कोणताही दुजोरा देण्यात आला नव्हता. निवडणुकीनंतरच्या संभाव्य स्थितीवर किशोर आणि उद्धव ठाकरे यांनी चर्चा केल्याचे सांगण्यात येते.प्रशांत किशोर यांनी नीतिशकुमार यांच्यासाठी लॉबिंग केल्याचा दावा या वृत्तपत्राने केला आहे.

एनडीएला पूर्ण बहुमत मिळाले नाही तर नितिशकुमार यांच्या पंतप्रधानपदाचा विचार करता येऊ शकतो असे किशोर यांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांचा विरोध नरेंद्र मोदी यांना असल्याने नीतिशकुमार यांना पाठिंबा देण्याचा विचार करू शकतात,असे गणित यामागे आहे.ज्यांना कॉंग्रेस आणि मोदीही नकोत अशा पक्षांचा पाठिंबा मिळवण्यासाठी प्रशांत किशोर यांनी मोहीम हाती घेतल्याचे बोलले जाते.

Previous articleपार्थ पवार लागले निवडणूक तयारीला
Next articleराहुल गांधी मिटवणार मुंबई कॉंग्रेसमधील वाद !