मातोश्रीला आव्हान देणा-या राणांना धड हनुमान चालिसाच्या चार ओळीही बोलता आल्या नाहीत

मुंबई नगरी टीम

मुंबई । उद्या शनिवारी सकाळी ९ वाजता आम्ही मातोश्रीवर आणि हनुमान चालीसा वाचणारच असे आव्हान अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी शिवसेनेला दिले आहे.मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत खासदार नवनीत राणा आणि रवी राणा यांनी दिलेल्या या आव्हानामुळे मातोश्री परिसरात मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हनुमान चालिसाच्या चार ओळी वाचून दाखवण्याचे आव्हान दिले. मात्र,पत्रकार परिषदेत रवी राणा यांना हनुमान चालिसाच्या चार ओळी बोलण्यास सांगितल्यावर त्यांवेळी त्यांना हनुमान चाळीसाच्या धड चार ओळीही बोलता आल्या नाहीत.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुंबईत येवून मातोश्रीवर जावून हनुमान चालीसा वाचणार असल्याचे आव्हान शिवसेनेला दिले होते.त्यामुळे मुंबईतील शिवसैनिकांनी सकाळीच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर गर्दी केली होती.मात्र त्यापुर्वीच खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी विमानाने मुंबई गाठली होती. राणा यांनी दिलेल्या या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीच्या बाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनीही मोठा बंदोबस्त तैनात केला होता.त्यांनतर खार येथिल निवासस्थानी पत्रकार परिषद घेत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी उद्या शनिवारी सकाळी ९ वाजता मातोश्रीवर जावून हनुमान चालीसा वाचणारच असे आव्हान दिले.बाळसााहेबांच्या विचाराचे शिवसैनिक असते तर आम्हाला हनुमान चालिसा वाचू दिली असती.महाराष्ट्राच्या हितासाठी, शेतकऱ्यांसाठी,बेरोजगारांसाठी हनुमान चालिसा वाचू दिली असती.महाविकास आघाडीचे संस्कार घेऊन ते आम्हाला विरोध करत आहेत.हे हिंदू हे पाहत आहेत, अशी टीकाही यावेळी रवी राणा यांनी केली.या पत्रकार परिषदेत काही पत्रकारांनी रवी राणा यांना हनुमान चालिसाच्या चार ओळी बोलण्यास सांगितल्या मात्र त्यांना त्या बोलताही आल्या नाहीत. मातोश्रीवर हनुमान चालिसा वाचण्याची भाषा करणारे रवी राणा यांना धड चार ओळी बोलता न आल्याने सर्वांना आश्चर्य वाटले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान चालिसा वाचली असती तर त्यांच्यावर ही वेळ आली नसती.पण ते बाळासाहेबांचे विचार विसरले असल्याने राज्यावर अनेक संकट आली.उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून राज्यात अनेक संकटे आली आहे.त्यामुळे महाराष्ट्रावरील विघ्न हटवण्यासाठी हनुमान चालिसा वाचण्याची गरज आहे,अशी टीकाही रवी राणा यांनी केली.शिवसेना आज भाजपमुळेच सत्तेत आहे.मोदींचा फोटो लावून शिवसेनेचे आमदार निवडून आले असल्यामुळे आमच्यावर भाजपचे खापर फोडू नये.आम्ही स्वबळावर निवडून आलो आहोत, असे रवी राणा यावेळी म्हणाले.उद्या सकाळी ९ वाजता आम्ही मातोश्रीवर जाणार असून, कोणत्याही परिस्थितीत हनुमान चालिसा वाचणारच असे आव्हान देत,पोलिसांना सहकार्य करून कायद्याचे पालन करणार असल्याचे राणा यांनी सांगितले.बाळासाहेब असते तर एकदा नाही शंभरवेळा हनुमान चालिसा वाचण्याची परवानगी त्यांनी दिली असती असेही राणा म्हणाले.दिवाळीत शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले त्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला.मात्र या सरकारने शेतकऱ्यांची दिवाळी काळी केली.मातोश्रीवर जाताना आम्हाला अटक करून तुरुंगात टाकले. आजही मला अमरावतीत बंदी करण्यात येणार होते. सरकार तुमचे आहे. तुम्ही आम्हाला आत टाकाल.मात्र जय श्रीराम आणि बजरंग बलीचे नाव घेण्यापासून आम्हाला कोणी रोखू शकणार नाही असेही राणा म्हणाले.

Previous articleराज्यात लोडशेडिंग होणार ; वाचा : कोणत्या भागांमध्ये जास्त लोडशेडिंग करणार
Next articleजयंतराव….नक्की कोणत्या काँग्रेसने नाव बदलले नाही म्हणून सांगता !