राज्यात लोडशेडिंग होणार ; वाचा : कोणत्या भागांमध्ये जास्त लोडशेडिंग करणार

मुंबई नगरी टीम

मुंबई । राज्यावर भारनियमनाचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती.मात्र राज्यात भारनियमन केले जाणार नसल्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत नसल्याचे ठामपणे सांगितले होते.अशातच आता राज्यात भारनियमन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यात नाईलाजाने भारनियमन केले जाणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी देवून राज्यातील कोणत्या भागात भारनियमन केले जाईल याची माहिती त्यांनी दिली.

उन्हाळ्याच्या झळांनी हैराण झालेल्या राज्यातील जनतेला आता भारनियमनाचे चटके सहन करावे लागणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे.राज्यातील वीज टंचाईच्या पार्श्वभूमीवर आज मुख्यमंत्री ठाकरे यांच्या उपस्थितीत यासंदर्भात बैठक पार पडली या बैठकीला ऊर्जामंत्री नितीन राऊत, ऊर्जा विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीनंतर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली.राज्यात असलेल्या वीजेच्या कमतरतेअभावी राज्यात भारनियमन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती राऊत यांनी देत, राज्यातील जनतेने काही दिवस सांभाळून घ्यावे, असे आवाहन केले.कोरोनाचे संकट टळल्यानंतर विजेच्या मागणीत वाढ जाली आहे.कोळसा टंचाईबाबत कोळसा मंत्रालयाने रेल्वे मंत्रालयाकडे बोट दाखवले आहे.शिवाय अदानी कंपनीने सुद्धा पुरवठा कमी केला असल्याने १४ हजार मेगावॅट वीजेचा तुटवडा निर्माण झाला. सीजीपीएलने केवळ ६३० मेगावॅट पुरवठा केला.तसेच सध्या खुल्या बाजारात वीज उपलब्ध नसल्याने हा तुटवडा केव्हा पर्यंत राहणार ते माहिती नाही असेही राऊत यांनी सांगितले.हवामान खात्याने राज्यात काही भागात एक-दोन दिवसात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.पाऊस पडल्यास भारनियमन कमी होईल असेही राऊत म्हणाले.केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशातील ९ राज्यांमध्ये भारनियमन होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कोणत्या भागांमध्ये जास्त लोडशेडिंग करणार
ज्या भागातील जनतेने वीज बिले भरलेली नाहीत आणि वसूली होत नाही शिवाय ज्याठिकाणी वीज चोरी होते त्याठिकाणी भारनियमन करण्यात येते.जी १, जी २ , जी ३ असे विभाग आखत भारनियमन केले जाते.अशी माहिती देवून नागरिकांनी चोऱ्या थांबवाव्यात.चोऱ्या होऊन देऊ नये, असे आवाहन राऊत यांनी केले.

Previous articleफडणवीस पुन्हा कधीही सत्तेत येऊ शकणार नाही ‘ हाच खरा धोका; काँग्रेसचा टोला
Next articleमातोश्रीला आव्हान देणा-या राणांना धड हनुमान चालिसाच्या चार ओळीही बोलता आल्या नाहीत