मुंबईत २३८घरांसह १०७ व्यवसायिक गाळ्यांसाठी लॉटरी निघणार

मुंबई नगरी टीम

मुंबई : मुंबईसह,पुणे आणि नाशिकमधील सर्वसामान्य  नागरिकांच्या हक्काच्या घराचे लवकरच पूर्ण होणार आहे.मुंबई, पुणे,नाशिकमधील हजारों घरांसाठी आचारसंहिता लागण्याआधी लॅाटरी काढण्यात येणार  असल्याची माहिती म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी केली आहे. तर औरंगाबादमध्ये आचारसंहितेनंतर घरांसाठी लॉटरी निघणार आहे.

म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत यांनी  मोठी घोषणा केली आहे. मुंबईत २३८ घरांसह १०७  व्यवसायिक गाळ्यांसाठी लॉटरी निघणार आहे पुण्यात ४४६४ घरांसाठी लॉटरी काढण्यात येणार आहे.नाशिकमध्ये १००० घरांसाठी आचारसंहितेपूर्वी  लॉटरी निघणार आहे तर औरंगाबादमध्ये ८०० घरांसाठी आचारसंहितेनंतर लॉटरी निघणार आहे, अशी माहिती सामंत यांनी दिली. कोकण विभागात देखील ९००० घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे. ही घरे कल्याण , डोबिंवली, खोणी, अंतरर्ली या परिसरात असतील, असे म्हाडाचे अध्यक्ष सामंत यांनी सांगितले.

मुंबईतील तुंगा पवईतील घरांच्या किंमती कमी होणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. म्हाडाचा १३० कोटीचा कर थकवलेल्या खाजगी बांधकाम व्यावसायिकांविरोधात कारवाई करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. म्हाडाच्या कर्मचाऱ्यांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार असल्याचे सामंत यांनी सांगून त्यासंदर्भात येणा-या प्राधिकरणाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होईल असे स्पष्ट केले. तर म्हाडातील ५११ रिक्त पदांसाठी आचारसंहितेनंतर भरती करण्यात येणार असल्याची मोठी घोषणा सामंत यांनी केली.

Previous articleनरेंद्र मोदी सरकारचे काम कार्यकर्त्यांनी जनसामान्यांपर्यंत पोहोचवावे
Next articleमुख्यमंत्री आणि अक्षयकुमारच्या उपस्थितीत होणार सामुदायिक विवाह सोहळा