युद्धजन्य परिस्थितीचा राजकीय फायदा घेऊ नये

युद्धजन्य परिस्थितीचा राजकीय फायदा घेऊ नये

मुंबई नगरी टीम

मुंबई : पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धजन्य वातावरण निर्माण झाले आहे. भारताने पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल हल्ले करून जोरदार वातावरण तयार केले आहे. यावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी युद्धजन्य वातावरण तयार करून त्याचा राजकीय फायदा घेऊ नये,असा टोला लगावला आहे.

राज ठाकरे यांनी म्हटले आहे की,युद्ध दोन्ही देशांना मागे घेऊन जाईल आणि काश्मीरमधील जनता भरडली जाईल.हे कुणालाच परवडणारे नाही.अतिरेक्यांना निष्ठूरपणे ठेचले पाहिजे परंतु त्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये.युद्ध आणि तशी परिस्थिती हे. कोणत्याही प्रश्नाचे उत्तर असू शकत नाही आणि अशा परिस्थितीचा राजकीय फायदा करून घेणे हे कोणत्याही उमद्या राजकारण्याचे लक्षण असत नाही,असा टोला त्यांनी मोदी यांना लगावला.

भाजपकडून भारतीय हवाई दलाने केलेल्या सर्जिकल हल्ल्यांचा वापर निवडणुकीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राज यांच्या या वक्तव्याकडे पहावे लागेल.अटलबिहारी वाजपेयी यांनी सुरू केलेली चर्चा पुढे नेण्याचे आवाहन राज यांनी केले.राज ठाकरे यांनी यापूर्वी भाजप सरकार निवडणूक जिंकण्यासाठी पाकिस्तानबरोबर युद्ध करेल आणि त्या जोरावर निवडून येईल,असा दावा केला होता.

 

Previous articleकोल्हापूरच्या दोन्ही लोकसभेच्या जागा शिवसेनेच्याच
Next articleमुंबई पोलीसांच्या ताफ्यात ३० “घोडेस्वार पोलीस”