नागपूरात नितीन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले ? 

नागपूरात नितीन गडकरी यांच्याविरोधात नाना पटोले ? 

मुंबई नगरी टीम

नागपूरः भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांच्याविरोधात काँग्रेसचे नाना पटोलेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या छाननी समितीसमोर पटोले यांनी गडकरी यांच्याविरोधात निवडणूक लढवण्यास संमती दिली आहे.यामुळे नागपुरात गडकरी विरूद्ध पटोले असा सामना होऊ शकतो. पटोले भाजप सोडून काँग्रेसमध्ये गेले आहेत.

काँग्रेसच्या छाननी समितीची आज दिल्लीत बैठक झाली. याबाबत पटोले यांनी सांगितले की,छाननी समितीकडून आज मला नागपुरातून निवडणूक लढवण्याबाबत विचारणा करण्यात आली.मी होकार दिला आहे.महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांच्याशी चर्चा झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागपूरमध्ये काँग्रेस विरूद्ध भाजप अशी सरळ लढत होणार आहे. अद्याप भाजपने गडकरी यांची उमेदवारी जाहीर केलेली नसली तरीही गडकरी तेथून लढणार हे जवळपास गृहीत आहे.

गडकरी आपल्या विकासकामांसाठी प्रसिद्ध आहेत.त्यांनी कोट्यवधी रूपयांची रस्त्यांची कामे केली आहेत. त्यामुळे नागपूरमध्ये त्यांना हरवणे कठीण समजले जाते. नाना पटोले अगोदर भाजप खासदार होते. पंतप्रधान मोदी यांच्यावर जाहीर टीका केल्याने ते चर्चेत आले. नंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यामुळे गडकरी आणि पटोले यांच्यातील सामना चुरशीचा आणि लक्षवेधी ठरणार आहे.सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे,रामटेकमधून मुकुल वासनिक,नांदेड येथून अमिता चव्हाण,दक्षिण मुंबईमधून मिलिंद देवरा यांची नावे काँग्रेसने निश्चित केली आहेत.

Previous articleस्वयंपुनर्विकासास चालना देण्यासाठी गृहनिर्माण संस्थांना विविध कर-शुल्कामध्ये सवलत
Next articleसाता-यातुन उदयनराजे भोसलेंनाच उमेदवारी