पाच वर्षांत खा. राजू शेट्टींची संपत्ती दुपटीने वाढली

पाच वर्षांत खा. राजू शेट्टींची संपत्ती दुपटीने वाढली

मुंबई ‌नगरी टीम

कोल्हापूरःशेतकरी प्रश्नांवर लढण्याचा दावा करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खा. राजू शेट्टी यांची संपत्ती पाच वर्षांत दुप्पट झाली आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले.त्यामुळे राजू शेट्टी यांची संपत्तीही समोर आली आहे. गेल्या पाच वर्षात राजू शेट्टी यांची संपत्ती दुुप्पट झाली आहे. अर्थात, राजू शेट्टी यांनी संपत्ती दुप्पट होण्याची कारणेही प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहेत.
राजू शेट्टी यांची संपत्ती :

रोख शिल्लक – २७ हजार रुपये

बँक शिल्लक – १४ लाख ७ हजार ४०५ रुपये

शेअर्स रक्कम – २ लाख ३३ हजार २५० रुपये

विमा रक्कम – १९ लाख २४ हजार १९४ रुपये

वाहन – १५ लाख ४७ हजार ७०० रुपये
सोन्याचे दागिने – ५ लाख ५८ हजार ७९० रुपये
शेत जमीन – २७ लाख ७० हजार २५० रुपये
गुंतवणूक : स्वाभिमानी दूध – २५ लाख ९० हजार रुपये
गुंतवणूक : स्वाभिमानी एमआयडीसी – ५३ लाख ६९ हजार रुपये
इतर गुंतवणूक – ५ लाख ३९ हजार रुपये
घर बांधकाम – ७४ लाख ६३ हजार ८०० रुपये
कर्ज रक्कम – ७ लाख ७४ हजार ५९ रुपये

२०१४ साली राजू शेट्टी यांची एकूण मालमत्ता ८३ लाख ८७ हजार रुपये होती. आता म्हणजे ३०१९ साली तीच मालमत्ता २ कोटी ३६ लाख रुपये एवढी झाली आहे. या मालमत्ता वाढीची कारणंही राजू शेट्टी यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केली आहेत.खासदार राजू शेट्टी यांनी मुंबई येथील फ्लॅट विकल्याने संपत्तीत ९८ लाखाची वाढ झाली आहे. तसेच, सरकारी मूल्यांकनाप्रमाणे जमिनीत १० लाख ७० हजारांची वाढ झाली आहे. शिवाय, लोकवर्गणीतून घरबांधणीसाठी २२ लाखांचा समावेश करण्यात आला असून, शासकीय पगार आणि भत्ता याचाही संपत्ती विवरणपत्रात समावेश केला असल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

Previous articleशिवाजी पार्कच्या बाभळीला “बारामतीची बोरे”
Next articleचंद्रकांतदादा खा.राजू शेट्टींना काय म्हणाले ?