‘करेक्ट’ कार्यक्रम करू म्हणणा-या शेट्टींच्या इशा-याला शरद पवारांनी दिले उत्तर

मुंबई नगरी टीम

पुणे । स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या जागी राष्ट्रवादीचे खजिनदार हेमंत टकले यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करावी असा प्रस्ताव राष्ट्रवादीने राज्यपालांना दिला असल्याची चर्चा असतानाच.यावर राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीचा ‘करेक्ट’ कार्यक्रम करू,असा इशारा दिला होता.त्यावर आज पुण्याच्या दौ-यावर असलेले राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह राट्रवादीच्या अनेक नेत्यांवर टीका करणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांची विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त सदस्य नियुक्ती करावी अशी शिफारस राष्ट्रवादीकडून करण्यात आली होती. मात्र दोनच दिवसांपुर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेवून १२ जणांच्या यादीला मंजूरी देण्याची विनंती केली होती.मात्र या भेटीत राजू शेट्टी यांची करण्यात आलेली शिफारस मागे घेण्यात येवून त्यांच्या जागी हेमंत टकले यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याची चर्चा आहे. यावर शेट्टी यांनी आक्रमक भूमिका घेत मी देखील करेक्ट कार्यक्रम करणार असा इशारा राष्ट्रवादीला दिला आहे.लोकसभा निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादी आणि आमच्या पक्षात समझोता झाला होता. तो पाळायचा की पाठीत खंजीर खुपसायचा हे राष्ट्रवादीने ठरवायचे आहे. आम्ही आमदाराकीची भीक मागायला त्यांच्या दारात गेलो नव्हतो असा टोलाही त्यांनी राष्ट्रवादीला लगावला आहे.

राजू शेट्टींच्या या आरोपावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनी आज आपली प्रतिक्रिया दिली आहे.पवार म्हणाले,राजू शेट्टी हे नाराज आहेत याबाबत मला काही म्हणायच नाही.मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे जी यादी सोपवली आहे.त्यात राष्ट्रवादीकडून त्यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.आम्ही याबाबतचा प्रस्ताव राज्यपालांकडे दिला असल्याने याचा निर्णय राज्यपालच घेतील त्यामुळे असा प्रकारची विधाने केली जातात त्यामुळे आश्चर्य वाटते ? आम्ही आमचे काम प्रामाणिकपणे केले आहे.शेट्टी यांना काय वक्तव्य करायचे असेल तर त्यावर मला भाष्य करायचे नाही.पण मी दिलेला शब्द पाळला आहे असेही पवार यांनी स्पष्ट केले.

Previous articleओबीसी आरक्षण : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुढे ढकलण्यात येणार
Next articleतीन पक्षाचं सरकार असलं तरी हे ‘ठाकरे’ सरकार आहे :राऊतांचे खळबळजनक वक्तव्य