राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पदमुक्त होणार का ? राजभवनाकडून करण्यात आला मोठा खुलासा

मुंबई नगरी टीम

मुंबई । महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे चर्चेत आलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना हटविण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे.त्यातच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची दिवसभर चर्चा सुरु होती.मात्र या वृत्तांचे राजभवनाकडून खंडन करण्यात आले आहे.

नितीन गडकरी आणि शरद पवार यांच्या उपस्थित झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याने त्याचे पडसाद राज्यभर उमटले होते.विरोधी पक्षांनी राज्यपालांना लक्ष्य करीत त्यांना हटवण्याची मागणी लावून धरली आहे.राज्यपालांच्या वादग्रस्त विधानामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजही नाराज झाले आहेत.राज्यपालांच्या विरोधात राज्यभर आंदोलने सुरू असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची दिवसभर चर्चा सुरु होती.या चर्चेचे खंडन राजभवनाकडून करण्यात आले आहे.राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या पदमुक्त होण्याबद्दल सुरु असलेल्या चर्चा अफवा आहे.राज्यपाल कोश्यारी यांनी पदमुक्त अथवा राजीनामा देण्याबाबत कोणतीही इच्छा व्यक्त केली नाही, असे राजभवनाकडून सांगण्यात आले आहे.

Previous articleअखेर योगगुरु बाबा रामदेव नरमले ! ‘त्या’ आक्षेपार्ह विधानाबाबत मागितली माफी
Next articleभविष्यात वैद्यकीय सहाय्यासाठी प्रत्येक तालुक्यात हेलिपॅड उभारण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना